JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकमध्ये शिवशाही बसचा अपघात, अ‍ॅक्सलेटरमध्ये वायरच्या ऐवजी... तपासणीनंतर एकच खळबळ

नाशिकमध्ये शिवशाही बसचा अपघात, अ‍ॅक्सलेटरमध्ये वायरच्या ऐवजी... तपासणीनंतर एकच खळबळ

नाशिक, 26 ऑक्टोबर : नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी कॉर्नर, पासपोर्ट ऑफिस समोर शिवशाही बस 11 kv विद्युत पोलला आदळल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की विद्युत पोल अक्षरशः अर्धा गाडी खाली जाऊन पूर्ण वक्राकार वाकला. काय आहे संपूर्ण घटना - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक वरून नाशिकरोडच्या दिशेने जाणारी शिवशाही बस ही शिखरेवाडी कॉर्नर, पासपोर्ट ऑफिससमोर असलेल्या पोलवर जाऊन आदळली. विद्युत तारा बसला अडकल्या असत्या तर बसमधील 55 ते 60 प्रवाशी व स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 26 ऑक्टोबर : नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी कॉर्नर, पासपोर्ट ऑफिस समोर शिवशाही बस 11 kv विद्युत पोलला आदळल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की विद्युत पोल अक्षरशः अर्धा गाडी खाली जाऊन पूर्ण वक्राकार वाकला. काय आहे संपूर्ण घटना - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक वरून नाशिकरोडच्या दिशेने जाणारी शिवशाही बस ही शिखरेवाडी कॉर्नर, पासपोर्ट ऑफिससमोर असलेल्या पोलवर जाऊन आदळली. विद्युत तारा बसला अडकल्या असत्या तर बसमधील 55 ते 60 प्रवाशी व स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. समोरील एक रिक्षाला बसचा धक्का लागल्याने रिक्षाचालक व बसमध्ये असलेल्या दोन मुली व काही प्रवाशांना दुखापत झाली. परंतु मोठी जीवित हानी टळली. मिरची हॉटेलच्या समोरील झालेल्या अपघातात 13जणांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर ही मोठी दुर्घटना होता होता वाचली. हेही वाचा -  नाशिकहून दिल्लीला विमानाने सुखरूप गेले पण…, 160 प्रवाशांसोबत धक्कादायक घडलं; पाहा VIDEO धक्कादायक माहिती समोर -  आश्चर्याची बाब अशी की, बसमधील अ‍ॅक्सलेटरमध्ये वायर नसून दोरीच्या सहाय्याने बांधलेले असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. बसचालक अशा प्रकारचा निष्काळजीपणा करूनही वाहतूक पोलीस अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या