JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'माझं काय चुकलं?'; आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सांगणार शिवसेनेचे हे चुकलेले निर्णय

'माझं काय चुकलं?'; आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सांगणार शिवसेनेचे हे चुकलेले निर्णय

आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande)हे निवेदन देणार आहे. यात ते ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याबाबतचा पत्रात उल्लेख करणार आहेत.

जाहिरात

आदित्य ठाकरे यांचा फोटो हा व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी या प्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 22 जुलै: शिवसेना आणि शिवसैनिक यांच्यातील वाढती दरी कमी करण्यासाठी आणि सेनेतील गळती थांबवण्यासाठी सध्या राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी सभा घेत ते कार्यकर्ते तसंच नेत्यांसोबत संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांची शिव संवाद यात्रा नाशिकमध्ये (Aaditya Thackeray in Nashik) धडकणार आहे. मात्र, या दौऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘OBC आरक्षण आमच्यामुळेच’; भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई, शिवसेनेनं केले हे दावे आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) हे निवेदन देणार आहे. यात ते ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याबाबतचा पत्रात उल्लेख करणार आहेत.

पालघर साधू हत्याकांड, मालवण येथील हिंदूचं पलायन, सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यांपसून शिवसेना दूर गेली. यामुळे हा निर्णय घेतला, तर यात ‘माझं काय चुकलं’ असा सवाल कांदे आदित्य ठाकरे यांना करणार आहेत. एकनाथ शिंदेंचा 200 मतांचा दावा फोल! राष्ट्रपती निवडणुकीत राज्यातून मुर्मूंना किती मतं? निवेदनात भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याची खंतही ते मांडणार आहेत. हे निवेदन देण्याआधी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदेनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल केले आहेत. सुहास कांदे आदित्य ठाकरे यांना या सगळ्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी ५ ते ६ हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत. सुहास कांदे यांच्या या भूमिकेमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या