JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला बनवतात ज्वेलरी, ‘या’ गोष्टीमुळे झाला आयुष्यात बदल Video

Nashik : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला बनवतात ज्वेलरी, ‘या’ गोष्टीमुळे झाला आयुष्यात बदल Video

प्रवरा मेडिकल ट्रस्टने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या रोजगाराच्या माध्यमातून महिला ज्वेलरी आणि सॅनेटरी नॅपकिन बनवण्याचे काम करत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 29 ऑगस्ट :  नाशिकमधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टने ( Pravara Medical Trust in Nashik )  रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरोना काळात आपला उदरनिर्वाह करणे ही कठीण झाले होते. मात्र,  त्याच वेळेस प्रवरा मेडिकल ट्रस्टने मदत केली. तेव्हापासून आज घडीला प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 50 ते 60 महिला ज्वेलरी आणि सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचे काम करत आहेत. प्रवरा मेडिकल ट्रस्ट गेल्या 17 वर्षांपासून या महिलांच्या आरोग्यासंदर्भात काम करत आहे. HIV किंवा इतर आजारांबाबत नेहमीच सतर्कता बाळगली जाते. प्रवरा मेडिकल ट्रस्टला जिल्ह्यातील जवळपास अडीच ते तीन हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यांना आरोग्याबाबत काहीही मदत लागली तर केली जाते.  कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा व्यवसाय हा पूर्णतः ठप्प होता. तेव्हा प्रवरा मेडिकल ट्रस्टने विचार केला की महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यानंतर काही संस्थांच्या मदतीने त्यांना ज्वेलरी आणि सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतर त्यांना कच्चा माल उपलब्ध करून दिला गेला आणि महिला काम करू लागल्या. या कामातून त्यांना दररोज तीनशे ते साडे तीनशे रुपये रोज मिळतो. यावर त्यांचा उदरनिर्वाह सध्या भागत आहे.   हेही वाचा :  टेरेस गार्डनमध्ये बहरले राष्ट्रीय फूल; छंदातून जोपासल्या 80 प्रजाती, VIDEO वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रवाहात आणण्याची गरज  आपल्या समाजात अजूनही या महिलांना तुच्छ वागणूक दिली जाते. त्यांना संशयास्पद नजरेने बघितल जात. त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र, या महिलांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याची गरज आहे. हा व्यवसाय करण्यामागे देखील अनेक कारणं असतात. त्याकडे कोणीच लक्ष देत नाही किंवा ते समजावून घेत नाहीत. प्रवरा मेडिकल गेल्या 17 वर्षांपासून या महिलांना मदत करत आहेत. राज्य सरकारने देखील अशा महिलांना रोजगार मिळवून देण्याची गरज आहे. त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या समन्वयक आसावरी देशपांडे यांनी दिली आहे. हेही वाचा :  National Sports Day : मुलाचा आवाज कानात घुमला आणि आईला मिळाली प्रेरणा, नाशिकच्या अश्विनी बनल्या Ironwomen, Video रोजगार उपलब्ध करून द्यावा आम्हाला रोजगार शासनाने उपलब्ध करून द्यावा. आमच्या हातात काही काम नसेल तर आम्ही कस जगायचं आमची मुलं आहेत. त्यांचा सांभाळ कसा करायचा प्रवरा मेडिकल ट्रस्टने रोजगार मिळवून दिला आहे. मात्र, शासनाने देखील मदत आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने दिली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ऑफिसचा पत्ता  शालिमार,गंजमाळ सिग्नल जवळ हे ऑफिस आहे. अधिक माहितीसाठी 9372492152 या नंबरवर संपर्क करू शकता. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या