नवी दिल्ली, 27 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाच्या 87 व्या भागात जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा स्वप्नांपेक्षा मोठे संकल्प असतात तेव्हा देश मोठी पावले उचलतो. जेव्हा संकल्पांसाठी रात्रंदिवस प्रामाणिक प्रयत्न केले जातात, तेव्हा संकल्पांची पूर्तताही होते. आणि माणसाच्या आयुष्यातही असेच घडते. पंतप्रधान मोदी यांनी आज नाशिक येथील स्वच्छतेचा वसा घेतलेल्या एका व्यक्तीची गोष्ट सांगितली. नाशिकचे चंद्रकिशोर पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी दर रविवारी रेडीओच्या माध्यमातून त्यांचा श्राव्य कार्यक्रम ‘मन की बात’ मधून जनतेशी संवाद साधतात. यावेळी त्यांनी नाशिक येथील स्वच्छतेला वाहून घेतलेल्या चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, की मन की बात या कार्यक्रमातून आपण स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या लोकांबद्दल नेहमी बोलतो. चंद्रकिशोर पाटील हे असेच एक स्वच्छता दूत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकचे ते रहिवासी आहेत. स्वच्छतेबाबात चंद्रकिशोर पाटील यांचा विचार खूप ठाम आहे. ते गोदावरी नदीच्या किनारी नियमित उभे राहून लोकांना नदीत कचरा टाकण्यापासून त्यांचे मन वळवतात. जर असे कोणी करत असेल तर त्यांना रोखतात. या कामात चंद्रकिशोर पाटील यांचा बराच वेळ खर्च होतो. सायंकाळपर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग लागतो, जे लोकांनी नदीत फेकण्यासाठी आणलं होतं. चंद्रकिशोर पाटील यांच्या या कार्याने जागृतही करतात आणि प्रेरणाही देतात.
जगात भारतीय वस्तूंची मागणी वाढली, Make in India ची शक्ती निर्यातीच्या क्षेत्रात भारताच्या यशाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हिमाचल, उत्तराखंडमध्ये उत्पादित धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली. आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यांतील बंगनापल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले. ही यादी खूप मोठी आहे आणि ही यादी जितकी मोठी असेल तितकी मेक इन इंडियाची (Make in India) ताकद जास्त असेल, भारताची ताकद जास्त असेल आणि त्याच्या क्षमतेचा आधार असेल. आमचे शेतकरी, आमचे अभियंते, आमचे छोटे उद्योजक, आमचे एमएसएमई क्षेत्र, विविध व्यवसायातील लोक, हे सर्व तिची खरी ताकद आहे.
11 वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयानंय काँग्रेस खासदाराला सुनावली एक वर्षाची शिक्षाGeM पोर्टलद्वारे 1 लाख कोटींहून अधिकची खरेदी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या एका वर्षात GeM पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 1.25 लाख छोटे उद्योजक, छोटे दुकानदार यांनी आपला माल थेट सरकारला विकला आहे. आता अगदी लहान दुकानदारही GeM पोर्टलवर आपला माल सरकारला विकू शकतो, हा नवा भारत आहे, जो केवळ मोठी स्वप्ने पाहत नाही तर ते ध्येय गाठण्याचे धैर्यही दाखवतो. या साहसाच्या बळावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू.