JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सत्यजित तांबे यांची अडचण वाढणार? महाविकास आघाडीचा तगड्या उमेदवाराला पाठिंबा?

सत्यजित तांबे यांची अडचण वाढणार? महाविकास आघाडीचा तगड्या उमेदवाराला पाठिंबा?

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने आता महाविकास आघाडी देखील तगड्या उमेदवाराला पाठींबा देणार आहे.

जाहिरात

सत्यजित तांबे यांची अडचण वाढणार?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जानेवारी : काँग्रेसचे नाशिक पदवीधरचे आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत पाठींबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. अब राजा का बेटा राजी नही बनेगा… काम करेल त्यालाच जनता निवडून देईल, अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना आव्हान दिलंय. शुभांगी पाटील यांनी नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्या निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झालंय. लवकरच ठाकरे गटाच्या नेत्याकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल. निवडणूक अर्ज भरताना मला पक्षाच्या वतीने एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं. वाचा - सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांच्या मौनाचा राजकीय अर्थ काय? याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पदवीधर मतदार संघ आता ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता शिवसेनेच्या या निर्णयाला महाविकास आघाडी पाठिंबा देणार की, शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्येच वाजणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पहिल्या महिला पदवीधर आमदार बनायचंय : शुभांगी पाटील शिवसेनेने पाठिंबा दिलाय, त्याप्रमाणे महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला तर माझ्या कामाच्या बळावर मी राज्यातील पहिली महिला पदवीधर आमदार बनू शकते, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली. पदवीधर उमेदवारांसाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देतेय. तर 45 ते 50 हजार भावांना घेऊन मी आझाद मैदानावर 6 दिवस अन्न व जलत्याग आंदोलन केलंय. त्यामुळे माझ्या कामासाठी मला तरुण निवडून देतील, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या