प्रवासी बस ट्रकचा डिझेल टँकर आढळल्याने स्फोट होऊन बसला आग लागण्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक, 08 ऑक्टोबर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी बसला आग लागल्यामुळे 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ज्यावेळी या बसचा अपघात झाला, तेव्हा बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समोर आले आहे. ही बस भरधाव वेगात डिझेल टँकरला धडकली, त्यामुळे आग लागली. नाशिक -औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या अपघातात बस मधील जवळपास १० प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, VIDEO) आरटीओ आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी बस ट्रकचा डिझेल टँकर आढळल्याने स्फोट होऊन बसला आग लागण्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालय ला भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली. अपघात अत्यंत दुर्दैवी आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो कदाचित मुख्यमंत्री काही वेळाने नाशिकला येतील. रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही, तरी मिळेल त्या गाडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. ज्या ठिकाणी अपघात झाले त्या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतील तर त्या ठिकाणी उपाययोजना करावे. अपघातग्रस्त बसमध्ये जर क्षमतेपेक्षा जास्त लोक असतील तर त्या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली. नाशिक बस अपघातातील मृतांचा वारसांना 5 लाखांची मदत दरम्यान, नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. (आगीत जळालेल्या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला; नाशकातील बस दुर्घटनेचे थरकाप उडवणारे Photos) या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.