JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik :18 व्या वर्षीच बनली अनाथांची ताई, प्रेरणादायी प्रवास वाचून वाटेल अभिमान! Video

Nashik :18 व्या वर्षीच बनली अनाथांची ताई, प्रेरणादायी प्रवास वाचून वाटेल अभिमान! Video

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी म्हणजे इतर मुलं -मुली आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं ? याचा साधा विचार देखील करत नाहीत. त्या वयात अश्विनीने ध्येय निश्चित केले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 27 डिसेंबर : ही प्रेरणादायी कहाणी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या युवा आदर्श ठरणाऱ्या अश्विनी संजय आढाव यांची.. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी म्हणजे इतर मुलं -मुली आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं ? याचा साधा विचार देखील करत नाहीत. त्या वयात अश्विनीने अनाथ,वंचित निराधार,जेष्ठ नागरिकांसाठी काम करण्याचे ठरवले, शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूल मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिक येथे नर्सिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी हा निर्धार केला. वयाच्या अठराव्या वर्षी तिला रस्त्यावर,पुलाखाली,अनाथ,अपंग,निराधार आणि मनोविकलांग व्यक्ती दिसायचे,यांचं भवितव्य काय ? अशा प्रश्नांनी अस्वस्थ होत, इतरांनी काही करण्यापेक्षा सुधारण्याची सुरुवात स्वतः पासून करावी,अस म्हणत अश्विनीने वृध्दाश्रम सुरू करण्याचा विचार केला, मात्र याच काळात वडिलांचे निधन झाले होते. घरची परिस्थिती बेताची,त्यामुळे घरून अशा लष्कराच्या भाकरी भाजण्याच्या कामाला विरोध मात्र यावर अश्विनीने मोठ्या धैर्यानं मात केली. कशी झाली सुरूवात? अश्विनीने  2016 साली सुखाश्रेय वृध्दाश्रम ही सेवाभावी संस्था  रजिस्टर केली,आणि इगतपुरी येथे कामाला सुरुवात केली. दोन आजी आजोबा आणि एक बेवारस दिव्यांग मुलगा यांचा सांभाळ करत समाजसेवेचा श्री गणेशा केला.नर्सिंग कोर्स झाल्याने तिच्यात सेवाभाव रुजला होताच, त्याला आपुलकीची आणि माणुसकीची जोड दिली. आपण ही समाजाचे काही तरी देणं लागतो, ही अश्विनीची भावना होती. गलेलठ्ठ पगार सोडण्याचं दाखवलं धाडस, मसाला उद्योगात बनवला ब्रँड, Video अश्विनीचे समाजसेवेचे काम वाढत असल्यामुळे तिने आता नाशिक मुंबई हायवेवर रायगड नगर येथे आपले सुखाश्रेय वृध्दाश्रम सुरू केले आहे.पन्नासहून अधिक जणांचे तिचे हे कुटुंब झाले आहे.अश्विनीचे लग्न झाले असून तिचे पती ही तिला या कामात मदत करतात. कोरोणा काळात ही तिने अतिशय छान काम केले आहे.त्यामुळे अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित केलं आहे. अश्विनी ताईच आमचं सर्वस्व वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका अजोबाचे हे शब्द ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आल,कोणी सांभाळत नाही, अश्विनी ताईच आम्हाला सांभाळते,सर्व गोष्टी देते,औषध पुरवते,तिचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत,इतक्या कमी वयात तीच हे काम बघून खूप आनंद वाटतो अशी भावना एका आजोबांनी व्यक्त केली आहे. एक हात नाही पण जिद्द दुप्पट, 4 जणांचा संसार चालवणाऱ्या लढवय्याची प्रेरणादायी गोष्ट, Video अनेक पुरस्कारांचा वर्षाव अश्विनी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या या समाज कार्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडली गेली आहेत. झाशीची राणी पुरस्कार छावा संघटना समाजसेवा पुरस्कार कोविड योद्धा पुरस्कार समाजसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

सुखाश्रेय वृद्धाश्रमाचा पत्ता नाशिक मुंबई हायवे,रायगड नगर, सुखाश्रेय वृध्दाश्रम फोन नंबर : 9657344111 / 9881323111,नाशिक शहरापासून साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या