JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : भारीच! एकाच हॉटेलमध्ये मिळतात 13 प्रकारचे कढई पोहे, पाहा Video

Nashik : भारीच! एकाच हॉटेलमध्ये मिळतात 13 प्रकारचे कढई पोहे, पाहा Video

Nashik: नाशिकमधील एका हॉटेलमध्ये 13 प्रकारचे पोहे मिळतात. हे खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नाशिक, 20 ऑक्टोबर : नाशिक हे खवय्यांचे माहेरघर झाले आहे. शहरातील गल्लोगल्लीत  वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. त्यामुळे खवय्यांची चांगलीच चंगळ होत आहे. नाशिक ची मिसळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मिसळ प्रमाणेच आणखी एक मराठमोठा पदार्थ म्हणजे पोहे. राज्यातल्या सर्व शहरांमध्ये उत्तम दर्जाचे पोहे मिळणारे किमान एक हॉटेल तरी नक्की असते. नाशिकही त्याला अपवाद नाही. शहरात अशी अनेक हॉटेल आहे. तिथं पोहेप्रेमींची नेहमीच गर्दी होते. हॉटेलच्या या स्पर्धेत देवेंद्र बैरागी आणि शुभम भोसले या दोन उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या कढई पोहे हे हॉटेल चांगलेच लोकप्रिय आहे. नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ भागात हे कढई पोह्याचे हॉटेल दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. गरमागरम कढई पोहे खाण्यासाठी हे हॉटेल आता सर्वांची पसंती बनलंय. इथं तब्बल 13 प्रकारचे पोहे खायला मिळतात. 13 प्रकारचे पोहे या हॉटेलमध्ये कांदा पोहे, दडपी पोहे, तर्री पोहे, बटाटा पोहे,दही तडका पोहे, कोकणचे पोहे, कढी पोहे, भेळ पोहे,चिवडा पोहे, चीज पोहे,पोहे कटलेट,पोहे चीज बॉल्स असे 13 प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यापैकी तर्री पोहे हा प्रकार ग्राहकांच्या विशेष पसंतीचा आहे, अशी प्रतिक्रिया या हॉटेलचे मालक शुभम भोसले यांनी दिली. Nashik : निसर्गरम्य वातावरणात खा चुलीवरची अस्सल झणझणीत मिसळ, Video

 ‘सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात हे पोहे विकले जातात. या हॉटेलमध्ये एक प्लेट पोह्याची किंमत 25 रुपये आहे. इथं पोह्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे उत्तम आणि चांगल्या दर्जाचे आहे. ग्राहक हा देव आहे, असे मानून त्यांना सर्व्हिस देण्याचा आमचा प्रयत्न असतो,’ असे भोसले यांनी स्पष्ट केले.

‘पोह्याला तोड नाही’ ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून या हॉटेलमध्ये पोहे खायला येतो. मला क्वालिटीमध्ये फरक आढळला नाही. इथं चांगल्या प्रकारचे साहित्य वापरून पोहे बनवले जातात. आपल्याला हवे ते गरमागरम पोहे मिळतात. त्याचा कधी पोटालाही त्रास झालेला नाही,’ असे कढई पोह्याचे नियमित ग्राहक राहुल राऊत यांनी सांगितले. नाशिकमध्ये खा अस्सल लोणी स्पंज डोसा, इंजिनिअर तरुणाचा नवा उद्योग, Video   गुगल मॅपवरून साभार कुठे मिळतात हे पोहे ? नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ भागात हे कढई पोहे मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या