नाशिक 10 नोव्हेंबर : नाशिक महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाथर्डी फाटा परिसरातील गामणे क्रीडांगणाची अक्षरशः दयनीय परिस्थिती झाली आहे. क्रीडांगणावरील जॉगिंग ट्रॅक खडतर झाला आहे. खेळनी मोडकळीस आली आहेत. मैदानात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गवत वाढलं आहे. स्वच्छतागृहाची दुर्गंधी सुटली आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरल्याने क्रीडांगणाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. गामणे क्रीडांगण नाशिक शहरातील सर्वात मोठं क्रीडांगण आहे. दररोज अनेक नागरिक,तरुण,विद्यार्थी वॉकिंग किंवा विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी येत असतात. त्यामुळे क्रीडांगणाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी. महानगरपालिका प्रशासनाला या संदर्भात आम्ही जाग आणून दिली आहे. मात्र, अद्याप तरी प्रशासनाने क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. विशेष म्हणजे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली आहे. जवळपास दोन ते अडीच हजार नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी बाळकृष्ण शिरसाठ यांनी दिली आहे.
भन्नाट! दिव्यांग व्यक्तीनं खराब फ्रिजचा वापर करुन बनवलं हॅचिंग मशीन, Video
स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष नाशिक शहरातील सर्वात मोठे क्रीडांगण आहे. जर व्यवस्थित दुरुस्ती केली. त्याची देखभाल केली तर नागरिकांना चांगला वेळ या ठिकाणी घालवता येईल. विशेष म्हणजे हे क्रीडांगण निर्मिती करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. जनतेच्याच पैशातून क्रीडांगणा निर्मिती केली आहे तर मग आता त्याची देखभाल महानगरपालिका का करत नाही. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी बंटी दोंदे यांनी केली आहे.
Nashik : बदलत्या वातावरणाचा फटका, द्राक्ष उत्पादकांसमोर उभं टाकलं मोठं संकट, Video
क्रीडांगणाची पाहणी करून समस्या सोडवणार स्थानिक नागरिकांकडून क्रीडांगणा दूरवस्थे विषयी माहिती मिळाली आहे. आम्ही क्रीडांगणाची पाहणी करून काय अडचणी आहेत. त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू,स्ट्रीट लाईट ज्या बंद असतील त्या देखील सुरळीत चालू करू अशी प्रतिक्रिया नवीन नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी मयूर पाटील यांनी दिली आहे.