नाशिक 29 जून : नाशिकमध्ये (Nashik) छान सोनाली पान दरबारची (Chhan Sonali Paan Darbar in nashik) जोरदार चर्चा आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल एक हजार मसाला पानांचे वेगवेगळे फ्लेवर खायला मिळतात. त्यामुळं नाशिककरचं नाही तर बाहेरून येणारे पर्यटक देखील इथं पान खाण्यास पसंद करतात. चला तर मग आज आपण या सोनाली पान दरबारबद्दल जाणून घेऊ… सुनील सयाजी कर्पे यांनी 1982 साली छान सोनाली पान दरबारची स्थापना केली आहे. मसाला पान खाणारे अनेक शौकीन असतात. त्यांना वेगवेगळे मसाला पान खाण्याची इच्छा असते. मात्र तेव्हा नाशिकमध्ये जास्त प्रकारची मसाला पान काही मिळत नव्हती. ग्राहकांची पसंती बघता त्यांनी या सोनाली पान दरबारची स्थापना केली. तेव्हापासून सोनाली पान दरबार आजपर्यंत सुरू आहे.
वाचा : आता काय करायचं? पवारांच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर ‘मातोश्री’वर खलबतं!
कोणत्या प्रकारचे पान मिळतात छान सोनाली पान दरबार मध्ये तुम्हाला एक हजार प्रकारचे मसाला पान खाण्यास मिळतील. त्यात चीज चॉकलेट पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पान, नवाबी पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान, सिल्व्हर मसाला पान, विजयवाडा पॅटर्न पान, मथुरा पॅटर्न पान, इंदोर पॅटर्न पान, चंदन मसाला पान, गुलाब मसाला पान, केशरी कस्तुरी पान ही मसाला स्पेशल पान मिळतील. अनेक पान शौकिनांची पसंती याच पानांना जास्त असते. किंमत किती आहे? 25 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पांनाची किंमत आहे. तुम्ही जसे पान घ्याल तशी किंमत आहे. जर तुम्हाला छान सोनाली पान दरबारला भेट देऊन मसाला पानांचा आस्वाद घ्यायचा असेलतर नाशिक शहरातच हे पान स्टॉल आहे. कॉलेज रोडला जलाराम स्विट जवळ हे छान सोनाली पान दरबार आहे. अधिक माहितीसाठी 84463777200, 9226022226 या क्रमांकावर संपर्क करू शकता. ऑर्डर देखील या ठिकाणी स्वीकारल्या जातात.
गुगल मॅप वरून सांभार… वाचा :
anil deshmukh and nawab malik : अनिल देशमुख, नवाब मलिकांना फ्लोअर टेस्टला मतदानाचा अधिकार मिळणार? या छान सोनाली पान दरबारचे मालक योगेश पानकर म्हणतात, “ग्राहक हेच आमचे देव आहेत. आम्ही ग्राहकांची जशी पसंती असेल. तशी मसाला पान तयार करतो. ग्राहकांनी 1982 सालापासून आमच्या या मसाला पान दरबारला पसंती दिली आहे. या ठिकाणी पान खाण्यास येणारे ग्राहक देखील पान खाल्यानंतर आनंदी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पान शौकीनांचा राबता आहे. नाशिक शहरात इतरही काही ठिकाणी मसाला पान स्टॉल आहेत. मात्र या पान स्टॉलची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळं नाशिकमध्ये जर आलात तर एकदा अवश्य या छान सोनाली पान दरबारला भेट द्यावी.”