JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : बाळासाहेब ठाकरे स्मारक बंद, शिवकालीन शस्त्रांवरही साचली धूळ! पाहा Video

Nashik : बाळासाहेब ठाकरे स्मारक बंद, शिवकालीन शस्त्रांवरही साचली धूळ! पाहा Video

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं उभं असलेलं नाशिकमधलं संग्रहालय सध्या बंद असून येथील शस्त्रांवर धूळ साचली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 12 डिसेंबर :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक महापालिकेत सत्ता असताना त्यांनी नाशिकमध्ये भव्य बाळासाहेब ठाकरे स्मारक, शस्त्र संग्रहालयाची निर्मिती केली होती. दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक शिवकालीन शस्त्र या संग्रहालयात ठेवण्यासाठी दिली होती. त्यानंतर दिवसातच या शस्त्र संग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. सध्या हे शस्त्र संग्रहालय धूळखात पडून असून याला जबाबदार तत्कालीन सत्ताधारी भाजप, शिवसेना असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. नाशिक हे ऐतिहासिक,धार्मिक शहर आहे.या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.त्यामुळे शहरात शिवकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्याची राज ठाकरेंची इच्छा होती.  महापालिकेत मनसेची सत्ता असल्यामुळे त्यांनी तात्काळ हे शस्त्र संग्रहालय उभारण्याचा विचार केला.  बाबासाहेब पुरंदरे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी देखील आपल्याकडील शिवकालीन शस्र देण्यास कबुली दिली. काही दिवसातच हे शस्त्र संग्रहालय उभं राहिलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी जतन केलेली शिवकालीन शस्त्र कट्यार, कडाबीन, तलवार, चाकू, निमचा, दांडपट्टा, बीचवा, भाला, वाघनखे, समशेर, सुरा, सोटा, तोड्याची बंदूक, छडी, गदा, जंबिया, गोफण, कुऱ्हाड, त्रिशूल, वज्र, ढाल, तोफ, हे शस्त्र संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. कोल्हापूर नव्हे बकालपूर, पाहा चांगल्या कल्पनेचा कसा झाला बट्याबोळ! Photos या संग्रहालयात  बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय हे नाव देण्यात आलं मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळा पार पडला. काही दिवस नागरिकांना हे शस्त्र संग्रहालय बघता आलं. मात्र 2017 साली मनसेची महापालिकेची सत्ता गेली आणि या संग्रहालयाची दुरवस्था झाली. या संग्रहालयामध्ये अक्षरशः लाईटही नाही. सर्व शस्त्रं धूळखात पडून आहे. बाहेरील परिसराला झाडा झुडपाणी वेढलं आहे. कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. मात्र याकडे मनपा दुर्लक्ष करत आहे, असा आरोप मनसेनं केलाय. आंदोलनाचा इशारा मनसेच्या काळात उभारलेल्या अनेक प्रकल्पाची अशीच अवस्था आहे.तत्कालीन भाजप सेना युतीची महापालिकेवर सत्ता होती. त्यांनी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केलं,आम्ही अनेक वेळा यासंदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केला मात्र कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.आम्ही स्वतः येऊन शस्त्र संग्रहालयाची अनेक वेळा स्वच्छता केली मात्र काही तरी कारण पुढे करत त्यांनी संग्रहालय बंदच ठेवलं. सध्या तिथं गेटच काम सुरू केलं आहे. याची काहीही गरज नव्हती. सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या फक्त राजकारण केलं जातंय. या विषयावर तातडीनं लक्ष दिलं नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसे पदाधिकारी संतोष कोरडे यांनी दिला आहे. राज्यातील पहिल्या पक्षीघराची दुरवस्था, पाहा कोण आहे कारणीभूत Video महापालिकेचा खुलासा हे संग्रहालय काही काम सुरू असल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे.  कामं झाली की लगेच हे सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर संग्रहालयाची स्वच्छता ही केली जाईल, अशी प्रतिक्रिया महानगपालिकेचे बांधकाम शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या