JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Whatsapp Group : न विचारताच अ‍ॅड केलं व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर, अन् तरुणासोबत घडला जीवघेणा प्रकार

Whatsapp Group : न विचारताच अ‍ॅड केलं व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर, अन् तरुणासोबत घडला जीवघेणा प्रकार

ही धक्कादायक घटना नाशिकच्या विजय नगर परिसरात घडली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 5 जून : सध्या सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आहे. प्रत्येक जण शेकडो व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये (Whatsapp Group) अ‍ॅड झालेला असतो. मित्र परिवार, नातेवाईक, ऑफिस, कामानिमित्त असे ग्रुप प्रत्येकाच्या व्हाट्सअ‍ॅपमध्ये आहेत. याच व्हाट्सअ‍ॅप वरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकमध्ये घडली. काय आहे घटना -  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या कारणावरुन एका तरुणावर जीवघेणा हल्ला (Attacked) करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये न विचारता अ‍ॅड केल्यामुळे ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी (Youth Injured) झाला आहे. या जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे वाद झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ही धक्कादायक घटना नाशिकच्या विजय नगर परिसरात घडली. न विचारचाच एका तरुणाला व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. याचा राग मनात ठेवून दोघांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. दीपक डावरे, असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच तपास करत याप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, या हल्ल्यामुळे सोशल मीडियातील शुल्लक वादातून टोकाची पावलं तरुणाई उचलत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाबाबत माध्यम साक्षरतेची गरज निर्माण झाली आहे. हेही वाचा -  पैशासाठी पत्नीने पार केली हद्द! पतीला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हायरल केला स्वतःचाच अश्लील व्हिडिओ, आता… दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअ‍ॅप सारखे माध्यमांमध्ये आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात गुंतली आहे. या अशाच व्हाट्सअ‍ॅप ग्रुप न विचारता अ‍ॅड केल्याने नाशिकमध्ये ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या