JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हातात चाकू आणि पिस्तूल घेऊन भाजप नेत्याच्या घरावर हल्ला, नाशिकमधील थरारक VIDEO

हातात चाकू आणि पिस्तूल घेऊन भाजप नेत्याच्या घरावर हल्ला, नाशिकमधील थरारक VIDEO

हातात चाकू, सुरे आणि पिस्तूल घेऊन गुन्हेगारांनी घरावर हल्ला केला आहे. 7-8 जणांच्या टोळक्याने सातपूर परिसरातील नागरे यांच्या घरावर दगडफेक करत घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 04 नोव्हेंबर : नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडवले जात असल्याचं चित्र आहे. नाशकातून आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात भाजप नेत्याच्या घरावर कुख्यात गुन्हेगारांनी हल्ला केला आहे. भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला केला गेला आहे. वाळू तस्करांनी केला जीवे मारण्याचा प्रयत्न, बचावासाठी तहसीलदाराने बंदूक काढली अन्…, भंडाऱ्यातील थरार हातात चाकू, सुरे आणि पिस्तूल घेऊन गुन्हेगारांनी घरावर हल्ला केला आहे. 7-8 जणांच्या टोळक्याने सातपूर परिसरातील नागरे यांच्या घरावर दगडफेक करत घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी घराबाहेर लावलेले बॅनर देखील फाडले. यासोबतच परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वर्दळीच्या ठिकाणी थेट नगरसेविकेच्या घरावरच हल्ला झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हल्ला झाला त्यावेळी विक्रम नागरे घराबाहेर असल्याने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. मात्र, नागरे यांच्या मातोश्रींना गुंडांनी धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. भंडारा : दिवाळीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; समजावायला गेल्याने दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात पोलीस आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. हे हल्लेखोर काही काळ घराच्या बाहेरच फिरले आणि नंतर त्यांनी दगड उचलून घरावर फेकण्यास सुरूवात केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या