JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी म्हणालो होतो, रश्मीताईंना मुख्यमंत्री करा, किमान त्या..'; सत्तारांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं

'मी म्हणालो होतो, रश्मीताईंना मुख्यमंत्री करा, किमान त्या..'; सत्तारांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं

सत्तार पुढे म्हणाले, की आज काय कामाख्या देवीला जाण्याची एकच तारीख नाही.आज नाही गेलो तरी नंतर जाईल. मुख्यमंत्री गेले म्हणजे पूर्ण महाराष्ट्र गुवाहाटीला गेल्यासारखं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 26 नोव्हेंबर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला गेले आहेत. मात्र, अब्दुल सत्तार गुवाहाटीला गेले नाही. यामागचं कारण आता सत्तार यांनी स्वतःच सांगितलं आहे. नाशिकचा माझा ठरलेला कार्यक्रम होता म्हणून गुवाहाटीला गेलो नाही. आमच्यात कुठेही विसंवाद नाही. सगळं चांगलं चाललं आहे. तुमच्याकडे कोणीतरी बातम्या पेरत आहे. मी नाराज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सत्तार पुढे म्हणाले, की आज काय कामाख्या देवीला जाण्याची एकच तारीख नाही.आज नाही गेलो तरी नंतर जाईल. मुख्यमंत्री गेले म्हणजे पूर्ण महाराष्ट्र गुवाहाटीला गेल्यासारखं आहे. माझ्यासारख्या लाखोंचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. त्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की ते दुसऱ्याला हात दाखवणार नाही, असं म्हणत सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. ‘राज्यपालांची हकालपट्टी करा’; गडकरी, फडणवीसांच्या नागपुरातील माजी भाजप आमदाराची मागणी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले, की अनेकदा मंत्रिमंडळाचा विस्तार टप्प्याटप्प्याने होतो. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार केली आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून लवकरच शपथ देखील देण्यात येणार आहे, असा खुलासा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, की मी फार कडवा शिवसैनिक नाही. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत आलो. 25 वर्ष काँग्रेसचा आमदार होतो. काही लोकांची नाराजी असेल तर तुम्ही मला नाव सांगा, मी शिंदे साहेबांना सांगतो. शिंदे साहेबांची गाडी लोकल आहे. हात दाखवा आणि गाडी थांबवा. यांची फक्त निशाणी हात आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत शिंदे साहेबांचा हात कसा आहे हे त्यांना कळेल, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. ‘मला मंत्रिपद हवं आहे, म्हणून…’; गुवाहाटी दौऱ्याआधी आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया पुढे सत्तार म्हणाले, की अजित पवारांनी देखील बारामतीचा एखादा रेडा घेऊन जायला पाहिजे आणि बळी द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांना आता पश्चाताप होत असेल. काय चुकलं याचा अभ्यास करायला उद्धव ठाकरे यांचा दौरा असावा. हेच आधी केलं असतं तर एवढी वाईट वेळ आली नसती.मी म्हणालो होती रश्मी ताई ठाकरेंना मुख्यमंत्री करा. किमान त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. म्हणजे जनतेचीं कामं होतील. अडीच वर्षात मुख्यमंत्री फक्त 4 वेळेस त्या खुर्चीवर बसले, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या