JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 22 वर्षांची तरुणीची कमाल, जळगाव जिल्ह्यातील शुभांगीची सरपंच पदाला गवसणी, जोरदार चर्चा

22 वर्षांची तरुणीची कमाल, जळगाव जिल्ह्यातील शुभांगीची सरपंच पदाला गवसणी, जोरदार चर्चा

जळगाव जिल्ह्यात या 22 वर्षीय सरपंच तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात

शुभांगी रहिले

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 22 डिसेंबर : राज्यात नुकतेच ग्रामंपचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. गावागावामध्ये नवे सरपंच निवडून आले आहे. पण यंदा ही सरपंचाची निवड खास राहिली आहे. कारण, कुठे सूनेनं सासूला हरवलं आहे तर कुठे आईने मुलीला हरवलं आहे. तर कुठे अगदी भाजी विक्रेता सुद्धा सरपंच झाला आहे. यात जळगाव जिल्ह्याची सुद्धा चर्चा होत आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील एका गावात फक्त 22 वर्षांची उच्चशिक्षित तरुणी सरपंच पदावर विराजमान झाली आहे. जळगाव जिल्ह्यात या 22 वर्षीय सरपंच तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. शुभांगी रहिले असे या तरुणीचे नाव आहे. तिने चाळीसगाव तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदावर विजय मिळवला आहे. शुभांगी ही एम एस्सीचे शिक्षण घेत आहे. तिने सरपंच पदाच्या निवडणकीत मिळवलेल्या या विजयानंतर हिच्या विजयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काय म्हणाली शुभांगी रहिले - गावकऱ्यांचे सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. उमदेवारी भरल्यानंतर निवडून येणंही खूप महत्त्वाचं असते. मला सर्वांनी सपोर्ट केला. यानंतर आता मीही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. शेती, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर काम करेन. भारत सरकारच्या योजना गावागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेन. हेही वाचा -  Gram Panchayat Election : गावाची निवडणूक भारी, कुठे भाजी विक्रेता, तर कुठे बँडवाला झाला कारभारी! दरम्यान, शुभांगी हिचे वडील याआधी ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत. त्यामुळे वडिलांसह राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली, असे शुभांगी हिने सांगितले. तसेच गावाचा विकास करण्यासाठी मी राजकारणात आली, असेही ती म्हणाली. दरम्यान, आता एम.एस्सी. चे शिक्षण घेणाऱ्या शुभांगीला गावाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे.  त्यात ती आता जनतेच्या किती अपेक्षा पूर्ण करते, कसा कारभार करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या