मालेगाव, 12 एप्रिल: नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आतापर्यंत कोरोनाचे 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नागरिकांमध्ये भीती आहे. मात्र, कोणीही गांभीर्याने घेण्यात तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. आता तर प्रशासनही हतबल झाले आहे. त्यात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहे. वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा.. पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये 30 नर्स क्वारंटाइन, एक नर्स आढळली पॉझिटिव्ह मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात कोरोनाबाधित 28 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. तरी देखील कोरोना या प्राणघातक रोगाला कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून बाजारात गर्दी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर नागरिकांमध्ये कोरोना हा किती घातक आहे, याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आहे असे आजीमाजी लोकप्रतिनिधीनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आता जर सर्वांनी मिळून कठोर पाऊल उचललं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. हेही वाचा.. कोरोना रोखण्यासाठी बारामतीकरांनी लढवली नवी शक्कल, वाचा काय आहे ‘बारामती पॅटर्न’ लॉकडाऊनचं उल्लंघन… मालेगाव शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणास स्थानिक नागरिक कारणीभूत ठरत आहेत. शहरात लॉकडाऊनचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ होत असून एकूण 400 जणांची पथके तैनात करण्यात आली आहेत. मालेगावात प्रत्येकाची चाचणी घेण्याचे ठरवण्यात आलं आहे. मालेगाव शहरातील एकूण परिस्थिती लक्षात घेता. पालकमंत्री छगन भुजबळ व मंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मालेगावी जाऊन आढावा घेत ताळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. संपादन- संदीप पारोळेकर