JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Analysis: Assembly Elections नंतर महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ? मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर

Analysis: Assembly Elections नंतर महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ? मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर

मोदींच्या उत्तर प्रदेश आणि इतर तीन राज्यातल्या विजयानंतरच्या भाषणात भाजपच्या हातातून येता येता राहिलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे रोख होता. त्यांच्या भाषणातली अनेक विधानं थेट नव्हती पण सूचक होती आणि त्यांचा नेम थेट महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारच्या वर्मावर होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 10 मार्च: सलग दुसऱ्या वेळी मोठ्या बहुमताने निवडून येत उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. मोदी-योगी डबल इंजिनचा हा विजय असल्याचं उघड बोललं जात असलं तरी कमजोर विरोधी पक्षसुद्धा कारण असल्याचं विरोधक सांगतात. मोदींच्या दिग्विजयाचा रथ 2022 मध्येही दौडत आहे आणि त्यात काँग्रेससारखा विरोधक सपशेल चिरडला गेला असल्याचं चित्र आहे. मोदींच्या उत्तर प्रदेश आणि इतर तीन राज्यातल्या विजयानंतरच्या भाषणात मात्र एक वेगळा सूरही दिसला. भाजपच्या हातातून येता येता राहिलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे त्याचा रोख होता. त्यांच्या भाषणातली अनेक विधानं थेट नव्हती पण सूचक होती आणि त्यांचा नेम थेट महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारच्या वर्मावर होता. महाराष्ट्रात भाजपविरोधात सगळेच पक्ष एकवटल्याने भाजप सत्तेपासून दूर राहिला. महाविकासआघाडीचं सरकार कितपत टिकेल असं वाटत असतानाच 2022 साल उजाडलं. पण महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांविरुद्ध सध्या भ्रष्टाचाराच्या चौकशा  सुरू आहेत. IT, ED यांनी सरकारमधल्या विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना लक्ष्य केलेलं असतानाच मोदींच्या भाषणात सूचक विधानं आली. ती बरोबर महाराष्ट्र सरकारच्या वर्मावर बोट ठेवणारी आहेत.

Pm modi LIVE : घोटाळेबाजांकडून केंद्राच्या ED, CBI वर दबाव; मोदींचा शिवसेना, राष्ट्रवादीला फटकारलं

मोदींच्या विजयोत्सवाच्या भाषणात वास्तविक भ्रष्टाचाराचा आणि सेंट्रल एजन्सीचा मुद्दा येणं सहाजित नव्हतं. पण तरी मोदी बराच वेळ यावर बोलले. मोदी म्हणाले, “जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांचाही  तिटकारा आला आहे. यापुढे कुठल्याही दबावाला न झुकता भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. " मोदींची ही विधानं कुणासाठी?

शरद पवार यांनीदेखील महाआघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आमचं सरकार मजबूत आहे, असं विधान केलं होतं. फडणवीस यांनी विधानसभेत उघड केलेल्या पेन ड्राइव्ह बाँबमागेही सेंट्रल एजन्सीजच्या हात असल्याचं विधान शरद पवार यांनी बुधवारीच केलं होतं. मोदींनी त्यांच्या भाषणात सेंट्रल एजन्सीवर अविश्वास दाखवणाऱ्यांचा उल्लेख नाव न घेता केला.

UP Election 2022: कोण म्हणतं BJP ला मुस्लिमांची मतं मिळत नाहीत? जाणून घ्या मुस्लीमबहुल भागातील स्थिती

संबंधित बातम्या

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही तारखा घोषित करून या तारखांना बॉम्ब पडेल, असं विधान केलं होतं. त्यामध्ये 11 मार्च ही तारीख होती. ‘मी ज्या ज्या तारखांना बॉम्ब पडणार असं सांगितलं होतं, ते ते घडत गेलं आहे. आता 11 तारखेला काय होतं ते पाहूया’, असं पाटील आज पुन्हा म्हणाले . ‘संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरले पाहिजे. कारण राऊत लोकसत्तेत जातील उद्या तरूण भारतमध्ये येतील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, असा सल्लावजा टोला पाटील यांनी लगावला. फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतर बोलताना महाराष्ट्रातही उलथापालथ होईल असं सूचक विधान केलं होतं. महाराष्ट्रात झालेल्या चुका इतर ठिकाणी करणार नाही, असं ते म्हणाले. या सगळ्याचा एकत्र विचार करताना आणि गाळलेल्या जागा भरताना असंच दिसतं की मोठी राजकीय उलथापालथ पुढील काही दिवसात महाराष्ट्रात घडू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या