अकोला 10 सप्टेंबर : नितीन गडकरी भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यादरम्यानच काही दिवसांपूर्वी भाजपच्या संसदीय मंडळातूनही गडकरींना काढून टाकल्याने चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे. अशात आता नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. शिंदे गटाचा एक आमदार होणार कमी? सुप्रीम कोर्टाने निर्णयामुळे आमदारकी धोक्यात! नितीन गडकरी नेहमी नेहमी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना भरपूर त्रास होत आहे. सध्या देशात चुकीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे तिथे त्यांचा जीव गुदमरत असेल तर आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत, अशी खुली ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे. ते अकोल्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, आपण काँग्रेसमध्ये कधीही जाणार नसल्याचं नितीन गडकरी यांनी याधीच स्पष्ट केलं आहे. आठवड्याभरापूर्वीच नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करताना गडकरींनी एक जुना किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, की ‘विद्यार्थी जीवनात काम करत असताना दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.’ संजय राऊतांचा काय आहे जेलमधून निघण्याचा एक्झिट प्लॅन, दिल्लीत कुणाची घेतली भेट? सुनील राऊतांनी स्पष्ट सांगितलं या ऑफरवर गडकरी म्हणाले होते, की ‘मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही’ नितीन गडकरी यांनी हा जुना किस्सा नागपुरातील कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सांगून काँग्रेसमध्ये कधीही प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.