JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / PM Modi In Nagpur : 'हे डबल इंजिन सरकार...' पंतप्रधान मोदींनी थोपाटली शिंदे-फडणवीसांची पाठ

PM Modi In Nagpur : 'हे डबल इंजिन सरकार...' पंतप्रधान मोदींनी थोपाटली शिंदे-फडणवीसांची पाठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतीही शुभ कार्य करत असताना गणेशाचे पूजन करत असतो.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतीही शुभ कार्य करत असताना गणेशाचे पूजन करत असतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 11 डिसेंबर : ‘महाराष्ट्राला 10 नव तारे मिळाले आहे. वेगवेगळे प्रकल्प सुरू झाले आहे. आजचे हे आयोजन म्हणजे हे डब्बल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये जलद गतीने कार्य करत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईचे अंतर कमी होईल, एवढंच नाहीतर 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टिव्हिटीने जोडत आहे’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतीही शुभ कार्य करत असताना गणेशाचे पूजन करत असतो. आज नागपुरात आहे, तर टेकडीच्या बाप्पाला माझे वंदन आहे, असं म्हणताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत एकच घोषणाबाजी केली. ( ‘समृद्धी’चं उद्घाटन करणार होतो पण.., अजितदादांनी बोलून दाखवली खंत ) ‘महाराष्ट्राला 10 तारे मिळाले आहे. वेगवेगळे प्रकल्प सुरू झाले आहे. आजचे हे आयोजन हे डब्बल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये जलद गतीने कार्य करत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईचे अंतर कमी होईल, एवढंच नाहीतर 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टिव्हिटीने जोडत आहे. या मार्गामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना मोठी संधी मिळाली असून रोजगार मिळणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. आज ज्या योजनांचे लोकार्पण झाले आहे, त्यांचे व्हिजन हे वेगवेगळे आहे. एम्सचं एक वेगळं महत्व आहे, तर समृद्धी महामार्गाचं वेगळं महत्त्व आहे. वंदे भारत, नागपूर मेट्रोचं तसंच आहे. पण हे सगळे एका फुलाच्या गुच्छामध्ये आहे. त्याचा सुगंध हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असंही मोदी म्हणाले. ( पंतप्रधानांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद; पाहा मोदींचा नागपुरातील VIDEO ) असं सरकार काम करत आहे, जे दळणवळणावर काम करत आहे. काशी ते पंढरपूरपर्यंत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करत आहे. जनधन योजना आपल्या अर्थव्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भावना नसेल फक्त वीट आणि दगडं दिसत असेल तर त्याचे नुकसान हे सर्वांना सहन करावे लागते. गोसीखुर्द प्रकल्पाचे 20 वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले. त्यावेळी 400 कोटी खर्च अंदाजे होते. पण अनेक वर्षांपासून असंवेनशील लोकांच्या भावनांमुळे काम होऊ शकले नाही. आता त्याच प्रकल्पाचे बजेट हे 18 हजार कोटी झाले आहे. 2017 मध्ये डबल इंजिन सरकार बनल्यानंतर या धरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. प्रत्येक समस्या सोडवली गेली, या वर्षी हे धरण पूर्णपणे भरले आहे, यासाठी 3 दशकांचा अवधी लागला तेव्हा या धरणाचा फायदा शेतकऱ्यांना झाला, असं म्हणत मोदींनी आघाडी सरकारवर टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या