JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता गरिबाची पोरंही शिकणार विदेशात, एक हजार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 'एकलव्य'चा पुढाकार

आता गरिबाची पोरंही शिकणार विदेशात, एक हजार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 'एकलव्य'चा पुढाकार

ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, या हेतूने हा प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 नोव्हेंबर : भारतातील लाखो विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जावं असं वाटतं. मात्र, अनेकांचं स्वप्न आर्थिक परिस्थिती असो किंवा मग मार्गदर्शनाअभावी पूर्ण होत नाही. आता मात्र, ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील एकलव्य नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ही संधी ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. एकलव्य संस्थेच्या माध्यमातून परिस्थितीवर मात उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आगामी काळात भारतातील ग्रामीण भागातील तब्बल 1 हजार विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचे ध्येय एकलव्यने ठेवले आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांचं परदेशातील शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होण्याच मदत होणार आहे. एकलव्यचे फाऊंडर हे राजू केंद्रे आहेत. मागच्या वर्षी त्यांना जगभरातील प्रतिष्ठित अशी चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. यामाध्यातून त्यांनी लंडन येथे जाऊन एक वर्ष शिक्षण घेतले. याचदरम्यान, राजू केंद्रे यांनी एकलव्य या संस्थेच्या माध्यमातून ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ या प्रोग्रामची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅाम’ची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, या हेतूने हा प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. प्रोग्रामच्या माध्यमातून पुढच्या दहा वर्षात एक हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवण्याची एकलव्य या संस्थेची योजन आहे. याबाबत मिळतं मार्गदर्शन - या प्रोग्रामच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अत्यंत गरिब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना इंग्लंड आणि युरोपात मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान, प्रसार माध्यमे आणि कायदा अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पीएच.डी. साठी मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असते, त्याठिकाणी अर्ज कसा करावा, मुलाखत कशी द्यावी, तसेच कोणकोणत्या प्रकारच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल, आयईएलटीएसचे प्रशिक्षण, व्हीजा काढण्यासाठी मदत करणे, विदेशी विद्यापीठातील प्रवेशासाठी लेखन करणे, लेटर्स ऑफ रिकमेंडेशन, याबाबत एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ या प्रोग्रामच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. हेही वाचा -  24व्या वर्षीच विदर्भाच्या दीपकचा अटकेपार झेंडा, ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवणारा बनला देशातील पहिला वकील या लोकाचं मिळणार मार्गदर्शन -  ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’चे पहिले निवासी शिबीर जुलै 2022 मध्ये वर्धा येथे आयोजित केले गेले. यानंतर दुसरे शिबीर हे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान, नागपूर येथील अशोकवन येथे सुरू आहे. यात साठहून अधिक विद्यार्थी आणि 8 मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. शिबिरात अदिती प्रेमकुमार (ऑक्सफर्ड विद्यापीठ), अनिश गवांडे (कोलंबिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ), आशीर्वाद वाकडे (शिकागो विद्यापीठ), भीमाशंकर शेतकर(जर्मन चान्सलर फेलो), पवन कुमार श्रीराम (इरॅसमस मुंडस स्कॉलर), सौरभ वैती (कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलर), सुमित सामोस (ऑक्सफर्ड विद्यापीठ) हे मार्गदर्शन करत आहेत. तर एकलव्य एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक अशा पद्धतीने 18 राज्यातील 100हून अधिक विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहे. जिथे 90 मार्गदर्शक मार्गदर्शन करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या