JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / DRDO चा भन्नाट प्रयोग, लष्करासाठी बनवलं वर्षभर ताजं राहणारं अन्न, Video

DRDO चा भन्नाट प्रयोग, लष्करासाठी बनवलं वर्षभर ताजं राहणारं अन्न, Video

झटपट तयार होणारे रेडी टू इट खाद्य पदार्थ एक वर्षाहून अधिक काळ ताजे राहते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 06 जानेवारी : भारतीय सैन्याबद्दल तमाम भारतीयांच्या मनात कमालीचा आदर आणि अभिमान आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय दुर्गम आणि विपरीत परिस्थितीत देखील ऊन, वारा, पाऊस अशी नैसर्गिक संकटांची कसलीही तमा न बाळगता हे जवान आपले कर्तव्य बजावत असतात. अशाच दुर्गम आणि विपरीत परिस्थितीत अडकलेल्या सैन्यातील जवानांसाठी संरक्षण, संशोधन आणि विकास या संघटनेच्या वतीने  एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकेल असे खाद्य पदार्थ तयार करण्यात आले आहे. संत्रा नगरीत सुरू असलेल्या 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये संरक्षण दलाची निगडित डीआरडीओ या संस्थेच्या वतीने सैन्यातील जवानांसाठी अन्नावर असलेल्या विविधाअंगी संशोधनाचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. त्यात या खाद्य पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास ही संघटना भारतीय सैन्याशी संलग्न असलेल्या विविधाअंगी विषयावर संरक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रावर कार्य करत असते. भारतीय सैन्य तुकडीतीलतील भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल इत्यादीसह अन्य तुकडीतील भारतीय सैन्य देशाच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. अश्या अति दुर्गम आणि अतिकठीण ठिकाणी तैनात जवानांसाठी अन्नाची गरज लक्षात घेऊन त्यांना उच्च दर्जाचे अन्न आणि रेशन पुरवण्यासाठी संशोधन करते. भारतीय सैन्य देशाच्या अनेक भागात जसे की वाळवंट, जंगल, बर्फाच्छादित प्रदेश, उंच गिरीशिखरे, तर दूरवर खोल समुद्रातील पाण्यात तैनात राहून आपले कर्तव्य बजावत असतात. अशा सर्व ठिकाणांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन जवानांना अन्नपुरवठा करण्यासाठी विशेष किट तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने झटपट तयार होणारे रेडी टू इट खाद्य पदार्थांसह एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकेल अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

वरण भाताचाही समावेश फळांचा रस, वरण भात, नाष्टा, ज्याने पोटाची भूक भागवता येईल अशा पदार्थाचा समावेश आहे. बर्फाच्छादित प्रदेशात जे खाद्य पदार्थ थंडीने गारठून टणक होऊ नये अशा खाद्यपदार्थांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. दुर्गम भागात आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील गरम जेवण पुरवण्यासाठी दोन पद्धती विकसित केल्या आहे यात पहिली पोर्टेबल स्टो द्वारे जेवण तयार केल्या जाऊ शकत तर दुसरी ज्यात एक सेल्फ हिटिंग सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे.   भौगोलिक परिस्थितीत टिकणार अन्न वायुसेनेत काम करणाऱ्यांसाठी या संस्थेने विशेष कीट तयार केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्गो गणवेशातील छोट्या खिशात मावेल अशी ही कीट फारच छोटी आहे. मात्र, यातील पदार्थांचे कॅलरी मूल्य अधिक असून त्यातून आवश्यक ती पोषणतत्त्वे मिळतात. या कीटमधील अन्नपदार्थ तर एक वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात. इतकेच नव्हे तर वाळवंट, जंगली प्रदेश, सियाचिनसारखा बर्फाळ प्रदेश, अशा ठिकाणांसाठी विविध प्रकारचे अन्न तयार करण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत स्थितीत टिकेल असे अन्न या संस्थेतर्फे तयार करण्यात आले आहे. सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते? पाहा Video विघटन पावणारी ताट, वाटी अतिशय महत्त्वांशी प्रयोग ठरलेल्या गंगायान मिशनच्या अनुषंगाने अंतराळात जाणाऱ्या एरोस्पेस मधील अंतराळवीरांना आवश्यक ते अन्नपदार्थ पुरवण्यासाठी आम्ही विशेष किट तयार केली आहे. ज्यात जेवण, नाश्ता यांचा समावेश करण्यात आला आहे. यासह विशिष्ट पद्धतीने जवळपास 180 दिवसानंतर पूर्णपणे विघटन पावणारी ताट, वाटी, ग्लास तयार करण्यात आले आहे. जी दिसायला आणि वापरण्यात प्लास्टिक सारखी दिसत असली तरी मात्र ती पर्यावरणात कुठलीही इजा व हानी पोहोचवत नाही, अशी माहिती डीआरडीओच्या वतीने देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या