JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, नागपुरात तरुणीवर वेळोवेळी अत्याचार

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, नागपुरात तरुणीवर वेळोवेळी अत्याचार

याप्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 16 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस बलात्कार, तसेच अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील नागपूर येथे आणखी धक्क्दायक घटना उघडकीस आली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अनेक महिने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - नंदकिशोर ऊर्फ नंदू मोरेश्वर उईके (वय 35, बाजारगाव, सावंगा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला गणेशपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडित तरुणी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर नंदू तिच्या घरी भाड्याने राहत होता. त्याची तरुणीवर अल्पवयीन असतानापासूनच वाईट नजर होती. त्यामुळे त्याने तिला स्वतःच्या जाळ्यात फसवून जून 2021मध्ये तिला गणेशपेठेतील जुन्या वस्तीतील एका घरात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर त्यावेळी त्याने तिचा व्हिडिओ आणि फोटोदेखील काढले. या प्रकारचे दुष्कर्म केल्यानंतर आरोपी हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला द्यायचा. तसेच ही धमकी देत त्याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. या सर्व प्रकाराला पीडिता कंटाळली होती. अखेर या प्रकाराला कंटाळून अखेर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. हेही वाचा -  आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रानडुक्कराचा हल्ला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर यानंतर तरुणीने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नराधम नंदूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या