नागपूर, 26 मे : मागच्या काही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूमुळे चर्चेत असलेल्या उमरेड-पवनी-करांडला (Nagpur Umred Tiger Project) वन्यजीव अभयारण्यासाठी चांगली घटना समोर आली आहे. नागपूरच्या उमरेड करांडला व्याघ्र अभयारण्यात पर्यटकांना शेरी नावाची वाघीणीने (sheri tiger) तिच्या पाच पिल्लांसह पर्यटकांना दर्शन दिले. पर्यटक ओंकार चांदूरकर हे काल सफारीला गेले असता त्यांनी हा थरार आपल्या कॅमेऱ्यात टिपला. सध्या उमरेड करांडला व्याघ्र अभयारण्यात रोज पर्यटकांना शेरी व तिच्या पिल्लांचे दर्शन होत आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. (wild life sanctuary)
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेल्या या अभयारण्यात अलीकडे पर्यटकांना दररोज वाघाचे दर्शन होत आहे. शेरी नावाच्या वाघिणीने तिच्या पाच पिल्लांसह पर्यटकांना दर्शन दिले आहे. यामुळे पर्यटकांसाठी ही चांगली गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : VIDEO : कोल्हापुरात फुटबॉल चषक स्पर्धेत खेळाडू-प्रशिक्षक भिडले, वाद मिटवण्यासाठी खुद्द छत्रपती मालोजीराजेंची मध्यस्थी
बुधवारी सकाळी पर्यटकांनी या वाघिणीला पिल्लांसह पाहिल्यानंतर अनेकांनी तीला कॅमेऱ्यात कैद केले आहे. दरम्यान तेथील एक व्हिडिओ व्हायरल झाला. काल (दि.25) गोठणगाव वेशीवरून जात असताना अनेक पर्यटकांना पिवळे-काळे पट्टे असलेल्या पाच बछड्यांसह वाघिण खुलेआम फिरत होती.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रादेशिक संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर यांनी लोकमत न्यूजशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्यात सफारीदरम्यान पाच पिल्लांसह वाघिण फिरत आहे. दरम्यान ही आनंदाची घटना असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा : सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक
या अभयारण्यात वनविभागाने केलेल्या प्रभावी व्याघ्र संवर्धनाचा हा पुरावा असल्याचे ते म्हणाले. अधिवास विकास कामे सुधारण्याचा हा परिणाम आहे. त्या वाघिणीची सर्व पिल्ले एक महिन्याची असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान याच अभयारण्यात जय नावाच्या वाघाच्या मृत्यूमुळे गेल्या काही वर्षांत या अभयारण्याची लोकप्रियता कमी झाली होती. याच काळात तीन पिल्लांसह वाघाची शिकार झाल्याची घटनाही घडली होती. त्या पार्श्वभूमीवर या जंगलात पाच नवीन पिल्ले दाखल झाली आहेत. यानिमित्ताने पर्यटक पुन्हा या अभयारण्याच्या दिशेने येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.