JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur Rain Update : वॉकी टॉकीच्या सॅटेलाईटमुळे नागपूर विमानतळाच्या दोन अभियंत्यांवर वीज कोसळली पुढे झालं ते भयानक

Nagpur Rain Update : वॉकी टॉकीच्या सॅटेलाईटमुळे नागपूर विमानतळाच्या दोन अभियंत्यांवर वीज कोसळली पुढे झालं ते भयानक

राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला होता तर नागपूर आणि परिसरात विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली होती. (Nagpur Rain Update)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑगस्ट : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला होता तर नागपूर आणि परिसरात विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली होती. (Nagpur Rain Update) दरम्यान मागच्या 24 तासांत नागपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. याचा फटका नागपूर  विमातळाला फटका बसला आहे. गेले दोन दिवस नागपुरात विजेच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसाचा फटका नागपूर विमानतळावरील दोन अभियंत्यांना बसला.

नागपुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वीज कोसळून दोन अभियंते जखमी झाले. उपचारानंतर दोघांची प्रकृती बरी असल्याची माहिती पुढे आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

हे ही वाचा :  …अजूनही दरवाजे खुले, शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान, शिंदे गटातले आमदार परतणार?

संबंधित बातम्या

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास अहमदाबादला जाणारे इंडिगो विमान नागपूरच्या विमानतळावर उतरत होते. या विमानाशी ग्राउंड क्लियरन्स स्टाफवर असलेले अभियंते वॉकीटॉकीवर बोलत होते. दरम्यान अचानक याच वेळेस वीज कोसळली. वॉकीटॉकीच्या रेडिएशनमुळे दोन अभियंते विजेच्या संपर्कात आले. त्यांना वीजेचा जोरदार झटका बसला व कोसळून ते जखमी झाले. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांना शहरातील खासगी किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपचारा दरम्यान दोघांची प्रकृती बरी असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या विमानतळ प्रशासन आणखी सतर्क झाले आहे. ही घटना घडली तेव्हा विमानावर वीज कोसळल्याची चर्चा शहरात पसरली होती. त्यानंतर मात्र विमानतळावरील विमानांचे उड्डाण सुरळीत सुरू झाले आहे.

हे ही वाचा :  कोकणात पाच दिवस पावसाचे थैमान, ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबई, पुणे परिसरात येलो अलर्ट

जाहिरात

(ऑरेंज अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर. जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर.

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली आहेत. ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११६ नागरिकांना जीव गमावला आहे, तर २३१ प्राणी दगावले आहेत. आतापर्यंत पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या