JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : संपूर्ण जगात फेमस असलेली नागपूरची संत्री बर्फी, नारंगी मिठाईची चव लई भारी!

Video : संपूर्ण जगात फेमस असलेली नागपूरची संत्री बर्फी, नारंगी मिठाईची चव लई भारी!

संत्रीपासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नागपुरातील बर्फीला खाद्यसंस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 13 ऑक्टोबर : जगाच्या नकाशात आपल्या आंबटगोड चवीमुळे नागपूरला ‘संत्रा नगरी’ म्हणून विशेष ओळख मिळवून देणारी नागपूरची संत्री म्हणजे नागपूरकरांच्या अभिमानाचा विषय आहे. नागपूरच्या परिघात संत्राचे पीक मोठ्या प्रमाणात होतं. संत्री पासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यातीलच संत्रा बर्फी ही एक. नागपुरातील खास ताज्या संत्र्यापासून तयार होणाऱ्या या बर्फीला सर्वत्र मागणी असून नागपुरातील खाद्यसंस्कृतीमध्ये संत्रा बर्फीला विशेष स्थान आहे.   नागपुरात गेल्या दोन दशकांपासून संत्र्यापासून संत्रा बर्फी आणि इतर पदार्थ तयार केले जातात. या स्वादिष्ट पदार्थाच्या निर्मितीसाठी नागपुरातील हिरा स्वीट प्रख्यात आहे. नागपूर लगतच्या भागात भौगोलिकदृष्ट्या आणि संत्रा लागवडीसाठी पूरक असे  वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रीचे उत्पादन घेण्यात येते. या ताज्या संत्रीचा मार्मलेड (मुरंबा) तयार करून ही संत्रा बर्फी तयार करण्यात येते. निसर्गरम्य वातावरणात खा चुलीवरची अस्सल झणझणीत मिसळ, Video महिलांच्या हातून तयार होते बर्फी भारतभर प्रसिद्ध असलेली संत्रा बर्फी नागपूरच्या खाद्य संस्कृतीत महत्त्वपूर्ण असून नागपूरची एक वेगळी ओळख आहे. संत्रा बर्फी सोबतच संत्रा रोल, संत्रा काजू कतली, ऑरेंज सोनपापडी, ऑरेंज बाईट्स असे पदार्थ तयार करण्यात येतात. तसेच हे सर्व पदार्थ विशेषतः महिला तयार करत असल्याची माहिती हिरा स्वीटचे मालक आत्माराम वाझिरणी यांनी दिली.  

संत्रा बर्फीचे दिवाने अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई तयार करण्याची लगबग सुरू आहे. इतर सणासुदीप्रमाणे दिवाळीत मिठाईची फार मागणी असते. आमच्या येथील मिठाईमध्ये सर्वाधिक पसंती संत्रा बर्फीला आहे. बाहेरील लोकं देखील या संत्रा वर्फीचे दिवाने असून बर्फी खरेदीसाठी नागपुरात येतात असे आत्माराम वाझिरणी सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या