नागपूर, 28 डिसेंबर : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांचे यथोचित आदरतिथ्य करणे तसेच दिवसभरातील कामाचा थकवा दूर करण्यासाठी प्रशासनाने खास मनोरंजनाची व्यवस्था उभारली आहे. सिव्हिल लाईन्स येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मैदानामध्ये मोबाईल डिजिटल पिक्चर थिएटर उभारण्यात आले आहे. पिक्चर थिएटरच्या माध्यमातून गाजलेले मराठी चित्रपट पाहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. आमदार निवासस्थानासमोरच हे थिएटर असल्याने याला चांगला प्रतिसाद लाभत असून या मोबाईल डिजिटल थिएटरचे सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे. यंदा पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग अधिवेशनाच्या काळात राबविण्यात आला आहे. Nagpur : जलतरणपटूंचे 3 वर्षांपासून हाल, पाहा काय आहे कारण Video पूर्वी ग्रामीण भागात गावातली जत्रेनिमित्त टुरिंग टॉकीज उभारण्यात येत होती. तंबूमधील चित्रपट म्हणजे या जत्रेचे विशेष आकर्षण त्याकाळी होत. दोन आणे, चार आण्यात गाजलेले चित्रपट पाहण्याचा आनंद जुन्या पिढीतील प्रत्येकाने घेतला असेल. 120 प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या आणि डिजिटल युगात टुरिंग टॉकीजची ही प्रथा लुप्त होत असताना नागपूर शहरामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशन निमित्त शहरात आलेल्या पाहुण्यांसाठी ‘मोबाईल डिजिटल मूव्ही थिएटर’च्या माध्यमातून गाजलेले मराठी चित्रपट पाहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. या थिएटरमध्ये एकाच वेळी 120 प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत मनोरंजन हुबेहूब मल्टिप्लेक्स सारखे दिसणारे हे थिएटर असून यामध्ये आत आधुनिक युगातील चित्रपटगृहाचा फिल अनुभवता येत आहे. अधिवेशन कालावधीतील या पहिल्याच उपक्रमाद्वारे पुढील 30 तारखेपर्यंत सायंकाळी सात ते दहा या काळात गाजलेले मराठी चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत. अधिवेशन काळात राजकीय नेते, कर्मचारी, अधिकारी व कार्यकर्त्यांसाठी संध्याकाळच्या वेळेला मनोरंजनासाठी या मोबाईल डिजिटल थिएटरचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात पहिल्यांदाच आम्ही हा प्रयोग राबवित असून येत्या 30 डिसेंबरपर्यंत मराठी सिने सृष्टीतील गाजलेले चित्रपट मोफत स्वरूपात या थिएटरमध्ये दाखवण्यात येणार आहे. राज्यातील ऐतिहासिक स्मारकांचा दुर्मीळ खजिना, मोफत छायाचित्र पाहण्याची सुवर्णसंधी मनोरंजनासह शासकीय योजनांची माहिती आतापर्यंत आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही गोष्ट सर्वांसाठी नवी असून चित्रपटांचा आनंद अनेक जण घेत आहेत. याचसोबत शिक्षण,आरोग्य, आणि शासकीय योजनांची माहिती सुद्धा या थिएटरमध्ये देण्यात येते. एक चांगला उपक्रम राबवण्यात येत असल्याची लोकभावना आहे, अशी माहिती पिक्चर टाइम्सचे प्रतिनिधी अनुराग शुक्ला यांनी दिली.