JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'स्टेअरिंग माझ्याच हाती' फडणवीसांनी कार चालवली अन् शेजारी बसले मुख्यमंत्री शिंदे, VIDEO

'स्टेअरिंग माझ्याच हाती' फडणवीसांनी कार चालवली अन् शेजारी बसले मुख्यमंत्री शिंदे, VIDEO

फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली यावेळी खुद्द कार ही फडणवीस यांनी चालवली.

जाहिरात

फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली यावेळी खुद्द कार ही फडणवीस यांनी चालवली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 04 डिसेंबर : राज्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. पण, आज खुद्द फडणवीस यांनी माझ्याच हातात स्टेअरिंग असल्याचे दाखवून दिलं आहे. फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली यावेळी खुद्द कार ही फडणवीस यांनी चालवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाचा दौरा करणार आहेत. सकाळीच ते नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कारने शिर्डीकडे रवाना झाले आहे.

फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. यावेळी कारमध्ये एकनाथ शिंदे हे शेजारी बसले होते. मर्सिडिज कारमधून दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे. नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेते एकत्र प्रवास करत आहे. (‘शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता’ भाजप आमदार प्रसाद लाड बरगळले) दरम्यान, ‘मी आज समृध्दी महामार्गाची पाहणी करणार आहे. 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच्या नियोजनाची तयारीच आढावा घेणार आहे. मला अतिशय आनंद आहे. राज्यातल्या गेम चेंजर प्रकल्पावर आम्ही काम केलं आहे. (भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा ) काम सुरू झालं तेव्हा देखील मी या खात्याचा मंत्री होतो आता लोकार्पण होत असताना मुख्यमंत्री आहे याचा मला आनंद आहे. मुंबई नागपुर जवळ येईल, उद्योग वाढलतील. या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं याच समाधान मला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या