JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काँग्रेसच्या माजी मंत्र्याची मुलाविरोधात उच्च न्यायालयात धाव; मानसिक छळ आणि गैरव्यवहारासह गंभीर आरोप

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची मुलाविरोधात उच्च न्यायालयात धाव; मानसिक छळ आणि गैरव्यवहारासह गंभीर आरोप

रणजित देशमुख यांच्या सिव्हील लाईन्समधील घरात मुलगा डॉ. अमोल देशमुख आणि सून राहत असून त्यांनी मानसिक छळ करून आपल्याला घरातून हाकलून दिलं असल्याचा आरोप रणजित देशमुख यांनी केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर 18 नोव्हेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आता आपल्या मुलाविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलगा आणि सून मानसिक छळ करत असल्याची याचिका त्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली. रणजित देशमुख यांच्या सिव्हील लाईन्समधील घरात मुलगा डॉ. अमोल देशमुख आणि सून राहत असून त्यांनी मानसिक छळ करून आपल्याला घरातून हाकलून दिलं असल्याचा आरोप रणजित देशमुख यांनी केला. ‘…तुमच्या गुरूंचा इतिहासच खंजिराचा’, राऊतांवर निशाणा साधताना भाजपचं टार्गेट पवार! अमोल देशमुख यांनी लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळात गैरव्यवहार केल्याचंदेखील रणजित देशमुख यांनी आपल्या आरोपात म्हटलं. हा आरोप करत सिव्हील लाईन्समधील घरातून डॉ अमोल देशमुख आणि त्यांच्या पत्नीने निघून जावे, असे आदेश देण्याची रणजित देशमुख यांनी न्यायालयाला विनंती केली होती. उपविभागीय दंडाधिकारी व निर्वाह न्यायधिकरणाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून अमोल देशमुख यांचा घरावर अधिकार असल्याचं निर्वाळा दिला. हा कौटुंबिक कलहाचा मुद्दा समोपचाराने सोडविण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. यानंतर आता या निर्णयाविरोधात रणजित देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Amol Kolhe BJP : अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या त्या निर्णयामुळे चर्चांना उधाण! गेल्या काही वर्षांपासून देशमुख पिता-पुत्रांमध्ये धुसफूस सुरू आहे. याआधी रणजित देशमुख यांनी अमोल यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार सीताबर्डी पोलिसांत केली होती. सिव्हिल लाईन्स येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल यांनी अवैधरित्या कब्जा केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, याचा काहीही उपयोग न झाल्याने आता देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या