JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur Crime : वृद्धांनी ATM वापरताना काळजी घ्या; नागपूरात हातचलाखीने 81 वर्षीय आजोबांचे 40 हजार लांबवले

Nagpur Crime : वृद्धांनी ATM वापरताना काळजी घ्या; नागपूरात हातचलाखीने 81 वर्षीय आजोबांचे 40 हजार लांबवले

आपल्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन 81 वर्षाचे गृहस्थ फ्रेंड्स कॉलनी चौकात असलेल्या एटीएममध्ये पैसे काढायला गेले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 4 जुलै : ऑनलाईनचा (Online) जमाना आहे. अनेक जण पेमेंट (Payment) करताना विविध अॅपचा वापर करतात. तर काही जण कॅशला (Cash) प्राधान्य देतात. नागपूरमध्ये एटीएममधून कॅश (Cash withdraw from atm) काढताना एका वृद्ध व्यक्तीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करत वृद्धाची फसवणूक झाली. ही घटना नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. काय आहे संपूर्ण घटना - आपल्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन 81 वर्षाचे गृहस्थ फ्रेंड्स कॉलनी चौकात असलेल्या एटीएममध्ये पैसे काढायला गेले होते. मात्र, त्यांच्यासोबत याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला. राजेंद्र रामचंद्र सिंह हे 81 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक एटीएममध्ये गेल्यावर एटीएममधील दुसऱ्या मशीनवर आणखी एक व्यक्ती उभा होता. सिंह यांनी मशीनमध्ये कार्ड टाकल्यावरदेखील पैसे येत नव्हते. नेमकं काय घडतंय, हे त्यांना कळत नव्हते. त्यांनी आणखी दोनदा प्रयत्न केले. मात्र पैसे निघाले नाही. वृद्धासोबत पुढे काय घडले - राजेंद्र सिंह यांच्यसोबत एटीएममध्ये असलेल्या एकाने त्यांना विचारले की, ‘क्या हुआ अंकल’. तसेच त्या व्यक्तीने राजेंद्र सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले आणि ते मशिनमध्ये टाकण्याचे नाटक केले. अशातच त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले आणि तिथून पळ काढला. सिंह यांच्या हे लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीने दिलेले कार्ड एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले असता ‘इनव्हॅलिड’ असा मॅसेज लिहून आला. त्यामुळे ते परत निघून गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी ते पैसे परत काढण्यासाठी परत गेले. त्यावेळीही त्यांना ‘इनव्हॅलिड’चा मॅसेज स्क्रिनवर आला. या प्रकारानंतर त्यांनी कार्ड निरखून पाहिले असता त्याच्यावर निहाल मालवी असे नाव दिसले. त्यानंतर त्यांना शंका आली आणि त्यांनी पत्नीच्या मोबाईलमध्ये मॅसेज तपासले असता अज्ञाताने त्यांच्या बँक अकाऊंटमधून तब्बल चार वेळा 9500 आणि एकदा 2000 रुपये, असे एकूण 40000 रुपये काढल्याचे समजले. यानंतर त्यांना धक्काच बसला. हेही वाचा -  अनोळख्या लिंकवर केलं क्लिक; कर्जाच्या नावाखाली विद्यार्थिनीला धमक्या, न्यूड मॉर्फ फोटोही व्हायरल याप्रकरणी त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या