नागपूर, 17 सप्टेंबर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी झालेल्या तरुणीच्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Nagpur) दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी प्राध्यापक डॉ. बी. बी. गुप्ता यांच्या नेतृत्वात पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन करून या चौकशी समितीला दोन दिवसात आपला अहवाल देण्याचे सांगितले आहे. दरम्यान झालेल्या घटनेने नागपूर शहर हादरले आहे. त्यामुलीला का व्हेंटिलेटर देण्यात आला नाही याबाबत अद्यापही कारण समजू शकले नाही.
पीडित मुलीला 15 सप्टेंबरला रुग्णालयात मेडिसिन विभागात भरती करण्यात आले होते व 16 सप्टेंबरला दुपारी तिचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला. नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एकूण 221 व्हेंटिलेटर आहेत. मेडिसिन विभागांमध्ये 15 व्हेंटिलेटर देण्यात आले होते.
हे ही वाचा : अमरावती : जावयाने केली मोठी फसवणूक, रिटायरमेंटचे 7 लाख अन् लाखोंचे दागिने लुटले
दरम्यान तीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेच्या दिवशी मेडिसिन विभागातील तीन व्हेंटिलेटर प्रेशर अभावी नादुरुस्त परिस्थितीत होते. त्यामुळे पीडित मुलीला अंबू बॅग( मॅन्युअल रेस्पिरेटर) वर ठेवण्यात आले होते वैष्णवी ची आई सलग 24 तास ती ॲम्ब्यु बॅग दाबत होत्या परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी त्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.
नागपुरात लग्नाला विरोध म्हणून उचललं टोकाचं पाऊल
प्रेमविवाहाला आजही अनेक ठिकाणी विरोध पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा प्रेमीयुगुल टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. लग्नाला घरच्यांचा विरोध होता म्हणून प्रेमीयुगुलाने आत्महत्या करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
हे ही वाचा : नागपूर : पत्नीसोबत सतत व्हायचा वाद; कंटाळलेल्या पतीने मध्यरात्रीच भांडणाचा केला भयानक शेवट
अरुण सुखदास कोडवते (वय 22, रा. रयतवाडी - वडांबा) असे यातील प्रियकराचे नाव आहे. तर अश्विनी रामेश्वर उईके (वय 22, रा. फुलझरी - जंगली) असे त्याच्या प्रेयसीचे म्हणजे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना रामटेक तालुक्यातील रयतवाडी येथे घडली. चार वर्षांपासून हे दोन्ही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अरुण कोडवते हा शेतकरी आहे. अश्विनी ही शेजारच्या गावातील तरुणी असून एका लग्नात त्यांची भेट झाली.