JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला. संध्याकाळी तरुणीचा मृतदेह स्थानिकांना दिसला आणि खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रतिनिधी तुषार कोहळे, नागपूर, २० ऑगस्ट : एकतर्फी प्रेमात वेड झालं की कोणत्याही थराला पोहोचतात. प्रेम मिळवण्याची ईर्षा निर्माण होते आणि मग त्यातून वाईट घटना घडतात. नागपुरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. त्यानंतर नागपूर हादरलं आहे. एकतर्फी प्रेमातून नागपूरच्या सुरादेवी परिसरामध्ये एका 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. या तरुणीची गळा आवरून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला. संध्याकाळी तरुणीचा मृतदेह स्थानिकांना दिसला आणि खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सुनेने मेव्हण्यासोबत मिळून घातला गोंधळ, घराचं मागचं दार खुलं ठेवलं अन्… मृतक ही खापरखेडा येथील काजल कुकडे असल्याची माहिती मिळाली आहे. ती एका रुग्णालयामध्ये नोकरी करत होती. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. यासंदर्भात पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या