JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / क्षुल्लक कारणातून तरुणाचा काकावर हल्ला, घडलं भयानक, 12 दिवसांनी आरोपीला अटक

क्षुल्लक कारणातून तरुणाचा काकावर हल्ला, घडलं भयानक, 12 दिवसांनी आरोपीला अटक

दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या घरी त्यांचे येणे-जाणे होते.

जाहिरात

पोलिसांनी अटक केलेला आरोपी.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 10 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच मुंबईत एका खूनाप्रकरणी पोलीस तपास करत होते. आता त्याच मुंबईतील मालवणी पोलिसांनी एका आरोपीला तब्बल 12 दिवसानंतर काकाच्या हत्याप्रकरणी अटक केली आहे. क्षुल्लक वादातून काकाची हत्या करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मालवणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. चाकूने गळ्यावर वार करून हत्या करून तरुण पळून गेला होता. अखेर 12 दिवसांनंतर त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. राजू शिवबहादूर कनोजिया असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी सुल्तान मेहताब शाह याला पोलिसांनी अटक केली. कनोजिया हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून त्याच्या पत्नीची बहीण मुन्नी शाह ही तिच्या दोन मुलांसह याच परिसरात राहते. तिचे 25 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तसेच तिला 24 वर्षांची एक मुलगी आणि सुल्तान नावाचा 20 वर्षांचा मुलगा आहे. ते दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या घरी त्यांचे येणे-जाणे होते. रविवारी 25 डिसेंबर 2022 रोजी रात्री राजू हा सुल्तानच्या घरी गेला होता. यावेळी क्षुल्लक कारणावरून त्याचा राजूशी वाद झाला, त्यावेळी सुल्तानने घरातील चाकूने राजूवर वार केले. त्यात राजूचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर 12 दिवसांनंतर आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. क्षुल्लक वादातून मौसाची हत्या करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मालवणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. हेही वाचा -  पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, धमक्या देत हजारोंचा चुनाही लावला, गोंदियातून तोतयाला अटक पुण्यात चाललंय काय? कोयता गँगनंतर आता गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ पुण्यात कोयता गँगनंतर आता गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली आहे. दौंड तालुक्यातील राहू येथे एक जण दोन गावठी पिस्तूल विकण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गावठी पिस्तूल विकायला आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तुषार काळे हा राहू येथे गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. सोमवार 9 जानवारीला तुषार काळे हा सायंकाळच्या सुमारास एका हॉटेलच्या ठिकाणी आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 गावठी पिस्तूल मिळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या