प्रतिकात्मक फोटो
मुंबई 29 जुलै : मुंबईच्या मालाड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात टीव्ही पाहाण्याचं वेड महिलेच्या जीवावर बेतलं. यात टीव्ही पाहताना झालेल्या हलगर्जीपणामुळे 27 वर्षीय रेखादेवी फुलकुमार निशाद नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. रेखादेवी टीव्ही पाहण्यात इतक्या मग्न झाल्या की त्यांनी उंदीर मारण्यासाठी ज्या टोमॅटोला विशारी औषध लावून ठेवलं होतं, तेच टोमॅटो खाल्लं. मुंबई : एका हातात लेकाचा हात, दुसरीकडे छत्री; तेवढ्यात चोरांनी साधला डाव, धक्कादायक Video सीसीटीव्हीत कैद उंदीर मारण्यासाठी ठेवलेलं हे टोमॅटो खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रेखादेवी मुंबईतील मालाड परिसरातील पास्कलवाडी, मारवेरोडे मालाड पश्चिम येथे कुटुंबासह राहत होत्या. घरात उंदरांची संख्या वाढल्याने महिलेने उंदीर मारण्यासाठी टोमॅटोवर विषारी औषध टाकलं होतं. जेणेकरून हे टोमॅटो खाल्ल्याने उंदीर मरतील, मात्र 27 जुलै रोजी दुपारच्या सुमारास रेखादेवी टीव्ही पाहत असताना मॅगी बनवत होत्या. टीव्ही पाहण्यात त्या इतक्या मग्न होत्या की त्यांनी मॅगी बनवत असताना चुकून उंदीर मारण्यासाठी ठेवलेलं टोमॅटो मॅगीमध्ये कापून टाकलं. महाराष्ट्रातून मुली गायब होतायेत, पुण्यापाठोपाठ अमरावतीतून शेकडो महिला-मुली मिसिंग मॅगी खाल्ल्यानंतर काही वेळातच त्या जमिनीवर पडल्या. थोड्यावेळात आसपासचे लोक तिथे पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की रेखा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडल्या आहेत. यानंतर महिलेला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात नेलं, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.