मुंबई, 10 ऑगस्ट : मुंबईतील BEST च्या बस अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजदेखील पाहायला मिळत आहे. सुदैवाने कोणाच्या जीवावर बेतलं नाही. मात्र काहीजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक किसन धोंगडे हे 326 क्रमांकाची बस चालवित होते. ही बस डाऊन दिशेने शिवशाही प्रकल्प, दिंडोशी वरून कुर्ल्याकडे जात होती. त्यावेळी साधारण 03.45 वाजता संतोष नगर बीएमसी कॉलनी, डी वार्ड समोरील मंदिराला बसने धडक दिली. बसने केवळ धडकच दिली नाही तर बस समोरील रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात बस चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले असून काही बस प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेदांत खाजगी रुग्णालय, दिंडोशी येथे उपचार सुरू आहे.
जखमींची नावे:- वाहक आबासो कोरे वय ५४ चालक कुंडलिक किसन धोंगडे वय ४३ होवाळ सरकू पांडे वय ४५ (रिक्षा चालक) बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालय,जोगेश्वरी प्रवासी- गोविंद प्रसाद पाठक वय ८० रजनिष कुमार पाठक वय ३७ वेदांत खाजगी रुग्णालय, दिंडोशी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.