मुंबई, 21 ऑगस्ट : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरुन दोन्ही गटाकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनात 50 खोके एकदम..ओक्के अशा घोषणा प्रवेशद्वाराजवळ देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. इथे ही खोके येतायेत मात्र ते खोके पैशाचे नाही तर निष्ठेचे असल्याचा असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे? सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50-50 कोटी दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावरुन आज उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. इथे ही खोके येतायेत मात्र ते खोके निष्ठेचे (सदस्य नोंदणीचे) आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पुढे ते म्हणाले, की निवडणुका कधी येतात याची जनता वाट बघते आहे, कधी निवडणुका येतात आणि आम्ही कधी या गद्दारांना धडा शिकवतो. मात्र, निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात काही हिंमत नाही असं मला वाटते. मातोश्री वर आलेल्या मिरजच्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
50 खोके…एकदम ओक्के… ‘50 खोके…एकदम ओक्के…’ अशी घोषणाबाजी करून विरोधकांनी पावसाळी अधिवेशचा (Maharashtra Assembly Monsoon Session) पहिला दिवस गाजवला होता. तर दुसऱ्या दिवशी ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी’ अशी घोषणाबाजी करून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यामुळे शिंदे गटांच्या आमदारांना काही बोलायला जागा उरली नाही.
हिंदूचे सण जागतिक स्तरावर नेतो म्हणून पोटशुळ का? उदय सामंतांचा गोविंदा आरक्षणावर सवाल
दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली : मुख्यमंत्री भाजप नेते प्रविण दरेकर यांच्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली होती. ‘तुम्ही दहीहंडी मधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली, त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले असं वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं. यावर आज ठाकरेंनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे.