केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा त्रास द्यायचा आणि आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं
मुंबई, 18 ऑक्टोबर : ‘माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि उमेदवारीच्या रिंगणातून पळ काढला. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा त्रास द्यायचा आणि आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील शिवसैनिक, पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव तसंच संजय गायकवाड, संजय रायमूलकर हे दोन आमदार शिंदे गटात गेलेत. त्यांच्या विभागातील भाजप, राष्ट्रवादी, बहुजन आघाडी, पक्षातील पदाधिकारी हे आज शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले धनुष्यबाण गोठवलं तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. धनुष्यबाण रामाचं होतं त्याने रावणाला मारण्यात आलं. मशालच्या अन्यायाला जाळणारी मशाल आहे आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आहे ती पुढे घेऊन जात काम करूयात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप) ‘माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि उमेदवारीच्या रिंगणातून पळ काढला. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा त्रास द्यायचा आणि आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं. मी बुलढण्यात येणार आणि सभा घेणार, असं आश्वासही उद्धव ठाकरेंनी दिलं. ‘माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत. त्यांना गद्दारांनी अनेक आमिषं दाखवली पण ते हलले नाहीत, त्यांना गाडून त्यांच्या छाताडावर उभं राहून ग्रामपंचायती निवडून आणल्या आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजन साळवींचं कौतुक केलं. दरम्यान, राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुबंई महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या त्रास द्यायची काम सध्या सुरू आहे. सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जात आहे आम्ही या कोणालाही भिक नाही घालता आम्ही ठाम पणे उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, असं साळवींनी ठणकावून सांगितलं. (वाचा - टोकाचे विरोधक येणार एकत्र! MCA निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी ) ‘काल पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निकालात कोकणाने दाखवून दिले आहे की शिवसेने शिवाय पर्याय नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने क्रांती केली आहे व लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. रिफायनी प्रकल्प व्हावा अशी स्थानिक लोकांची भूमिका आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. स्थानिक लोकांना रोजगार देखील यातून मिळेल, असंही साळवी म्हणाले. ‘संजय शिरसाट हे आमच्या सोबत होते आता ते आमच्यासोबत नाही आहेत. तरीसुद्धा देवाकडे प्रार्थना करेल त्यांना व्यवस्थितरित्या ते यावे त्यांना चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना,असंही साळवी म्हणाले.