JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईच्या 'या' वाद्यांना आहे विदेशातही मागणी, पाहा VIDEO

मुंबईच्या 'या' वाद्यांना आहे विदेशातही मागणी, पाहा VIDEO

मुंबईतील वाद्यांना विदेशात मागणी आहे. पण ही वाद्य कशी बनवली जातात? कोणती आहेत हे वाद्य जाणून घ्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 ऑक्टोबर : वाद्य आणि संगीत म्हणजे अनेकांच्या जिवाभावाची गोष्ट असते. कारण की अनेकांना वाद्य वाजवायला आवडतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाद्य बनवली जातात. मुंबईत सुद्धा चिंचपोकळी स्थानकाजवळ वाद्यांची दुकानं आहेत. येथील वाद्याची विक्री फक्त महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा होते. चलातर मग ही वाद्य कशी बनवली जातात? कोणती आहेत हे वाद्य आपण जाणून घेऊया. शास्त्रीय संगीत असो, भजन असो वा इतर कुठलाही गायनप्रकार असो त्याला वाद्याची जोड मिळाल्याशिवाय त्या गाण्याला ताल मिळत नाही. त्यामुळे पारंपारिक वाद्यांना पसंती मिळते. वाद्य बनवणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असली तरीसुद्धा मुंबईतील चिंचपोकळी स्थानकाजवळ लालबाग इथे पिढीनपिढी चालत आलेला वाद्य बनवण्याचा व्यवसाय करणारी 4-5 दुकानं आहेत. इथे महाराष्ट्रातून आणि भारतातून अनेक लोकं प्रत्यक्ष वाद्य खरेदी करण्यासाठी भेट देतात. तसेच अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी यावाद्यांची मागणी आहे. हेही वाचा :   Mumbai : संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video कोणती पारंपारिक वाद्य येथे बनवून मिळतात? खरं पाहिलं तर पारंपारिक वाद्यांचे अनेक प्रकार आहेत. ढोलक, ढोलकी, पखवाज, मृदूंग, तबला, हार्मोनियम, नगारा, गाजी ढोल, बोँगो, कोंगो, कच्छी ढोल, पंजाबी ढोल, ताशा ई. प्रकारचे वाद्य इथे बनवून मिळतात. वाद्य बनवताना त्याच्या तालाची योग्यता तपासूनच ग्राहकांच्या हातात वाद्य सुपूर्त केले जातात. कधीपासून हा व्यवसाय करणारी लोकं येथे आहेत? गेल्या 4-5 पिढ्यापासून लालबाग येथे वाद्य बनवण्याचा व्यवसाय आहे. आपल्या पूर्वजांनी सुरु केलेला हा व्यवसाय अनेकजणांनी बंद केला. मात्र, या परिसरात काहीच दुकानदार आहेत. त्यांनी हा व्यवसाय सुरु ठेवला आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा वाद्य बनवण्याचे धडे ते देत आहेत. हेही वाचा :  मुंबईत दोन आहेत ‘गेट वे ऑफ इंडिया’, दुसऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video ही वाद्य कशी बनवली जातात? ही वाद्य बनवण्यासाठी गणेशोत्सवानंतर 2 महिन्यांनी सुरुवात होते. वाद्यांसाठी शिसम तसेच इतर मोजक्याच प्रकारचे लाकूड वापरता येते. त्यामुळे ते लाकूड आणून त्यावर प्रक्रिया करून वाद्य बनवण्याचा कालावधी 8 महिन्यांचा असतो. या 8 महिन्यात लाकूड वाळवून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शेळी व म्हशीच्या कातड्यापासून वादी आणि वाद्यावर वाजवण्याचा भाग तयार केला जातो. लोखंडाचे पावडर व केमिकल मिक्स करून त्यावर शाही चढवली जाते आणि वाद्याचे ट्युनिंग जुळवून वाद्य तयार होते. या संपूर्ण प्रक्रियेला 8 महिने लागतात. या वाद्यांच्या किंमती काय आहेत? लालबाग येथे असलेल्या आय. सी. टी. ईश्वरलाल छोटालाल तबला वाले यांच्या दुकानात 3000 ते 50000 रुपयांच्या आत वाद्य उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या ऑर्डर नुसार या वाद्यांमध्ये मटेरियल वापरले जाते. त्यामुळे त्याची किंमत ही क्वालिटी नुसार ठरते. हे वाद्य बनवायला आम्हाला 8 महिने सुद्धा अपूर्ण पडतात कारण वाद्याची प्राथमिक प्रक्रिया खूप मोठी आहे. तसंच सण उत्सव सुरु झाले की बनवलेली वाद्ये सुद्धा अपूर्ण पडतात. असं आय. सी. टी. ई ईश्वरलाल छोटालाल दुकानाचे मालक प्रितेश चव्हाण यांनी सांगितलं. हेही वाचा :  Mind It : मुंबईत मिळतो हवेत उडणारा ‘रजनीकांत स्टाईल’ डोसा, पाहा Video गुगल मॅपवरून साभार ही दुकाने कुठे आहेत ? चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून लालबागच्या दिशेने 5 मिनिटांच्या अंतरावर हे दुकाने आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या