‘आपले गुरुजी‘ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावा याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे
मुंबई, 27 ऑगस्ट : दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना 5 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वच स्तरातून शिंदे सरकारवर (shinde government) टीका होत आहे. आता शिक्षण विभागाने एक अजब निर्णय घेतला आहे. वर्गांमध्ये आता शिक्षकांचा फोटो (teacher photo) लावण्यात यावे, असा निर्णयच शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. शाळा, महाविद्यालय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रासाठी कार्य करणाऱ्या महान व्यक्तींचे फोटो आपण पाहत असतो. पण, आता वर्गांमध्ये शाळेच्या शिक्षकाचे फोटो लावावे, अशी अफलातून कल्पना शिंदे सरकारने शोधून काढली आहे. ‘आपले गुरुजी‘ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावा याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. त्यानुसार, २ आठवड्यात याबाबत पुर्तता करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वतः उपस्थित न राहता इतर कोणालाही पाठवायचे अशी प्रकरण वाढत असल्याने शासनाचा वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा अजब निर्णय घेतला आहे. (द्राक्षे गोड की आंबट ठरणार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार सत्तांतरानंतर येणार एकाच मंचावर) काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारने दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण मिळणार अशी घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. सर्वच स्तरातून शिंदे सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यानंतर सरकारने माघार घेत गोविंदांसाठी नवी नियमावली तयार केली जाईल, अशी भूमिका मांडली.