JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 40 खंजीर पाठीत खुपसल्यानंतर आणखी कसली भीती वाटणार? आदित्य ठाकरेंनी आठवला तो भयंकर दिवस

40 खंजीर पाठीत खुपसल्यानंतर आणखी कसली भीती वाटणार? आदित्य ठाकरेंनी आठवला तो भयंकर दिवस

आदित्य ठाकरेंनी अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 सप्टेंबर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान आपली भूमिका मांडली. CNN News18 च्या TOWN HALL या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी सध्याच्या राज्यातील सरकारवर त्यांनी निशाणा साधला. मुंबईतील हिंदमाता या ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचलं नाही. आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं. असं म्हणताना त्यांनी सध्याच्या सरकारवरही निशाणा साधला. शिवसेनेतील 40 जणांच्या बंडखोरीबद्दल ते म्हणाले की, सर्वांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. यानंतर जनता जो काही निर्णय देईल, तो आम्ही स्वीकार करू.

जनतेला नेमकं काय घडलं हे माहिती आहे. त्यामुळे ते आमच्या पाठिशी उभं राहतील, यावर माझा विश्वास आहे. मुंबईला शांघाय बनवणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सारेच अचंबित उद्धव ठाकरे यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना भेटण्यासाठी तीन वेळा RTPCR टेस्ट घ्यावी लागत होती. त्या काळात 40 आमदार शिवसेना फोडण्याची प्लानिंग करीत होते.

तो काळ कुटुंबासाठी कठीण होता, असं म्हणत आदित्यनीं तो भयंकर दिवस आठवला. याशिवाय त्यांना शिवसेना चिन्ह गमावण्याबद्दल विचारण्यात आलं. यावर आदित्य म्हणाले की, 40 खंजीर पाठीत खुपसल्यानंतर आणखी कसली भीती राहिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या