JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raj Thackery : बाळासाहेबांनी मिठी मारली आणि..., राज ठाकरेंनी सांगितला 'मातोश्री'तून 'तो' क्षण

Raj Thackery : बाळासाहेबांनी मिठी मारली आणि..., राज ठाकरेंनी सांगितला 'मातोश्री'तून 'तो' क्षण

भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. त्यांनी बंड केलं आणि एका पक्षात गेले. पण या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं आणि बाहेर पडला

जाहिरात

भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. त्यांनी बंड केलं आणि एका पक्षात गेले. पण या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं आणि बाहेर पडला

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : ‘या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं आणि बाहेर पडला आहे. बाळासाहेबांना जेव्हा कळलं होतं, आत हा काही राहत नाही. ही शेवटची भेट आहे. पण निघताना मनोहर जोशी तिथे होते, जोशी बाहेर गेल्यानंतर मला बाळासाहेबांनी भेटायला बोलावलं आणि हात पसरवून मिठी मारली आणि जा म्हणून सांगितलं’ असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत सांगितलं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबई पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी आपण शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, त्यावेळी मातोश्रीवर काय घडलं होतं, याचा उलगडा केला. ’ कोण कुणामध्ये मिसळलं हे कळत सुद्धा नसेल. हे जर राजकारण असं तुम्हाला वाटत असेल तर हे तात्पुरती आर्थिक अडजेमेंस्ट आहे. मी मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं. भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. त्यांनी बंड केलं आणि एका पक्षात गेले. पण या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं आणि बाहेर पडला. बाळासाहेबांना जेव्हा कळलं होतं, आत हा काही राहत नाही. ही शेवटची भेट आहे. मातोश्रीतून निघताना मनोहर जोशी तिथे होते, जोशी बाहेर गेल्यानंतर मला बाळासाहेबांनी खोलीत भेटायला बोलावलं आणि हात पसरवून मिठी मारली आणि जा म्हणून सांगितलं. त्यांना समजलं होतं. त्यामुळे मी दगा फटका करून, खंजीर खुपसून बाहेर गेलो नाही. बाहेर जाऊन कुठल्या पक्षातही गेलो नाही, तुमच्या बळावर पक्ष उभा केला’  असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. मग तेव्हा का बोलला नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल ‘शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे, अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली होती. मला आजही आठवतं मी त्यावेळी बैठकीला हजर राहत होतो. कधी घरी बैठका व्हायच्या किंवा सेंटार हॉटेलमध्ये बैठक व्हायची. त्यावेळी मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते हजर होते. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं. जर हे ठरलं होतं तर मग 2019 ला मागणी कशीच करू शकता. शिवसेने आमदार कमी आले होते. चार भिंतीमध्ये कमिटमेंट घेतली होती. त्या चार भिंतीमध्ये होत तरी कोण, एकतर हे खोटं बोलताय नाहीतर ते खोट बोलताय.  मुळात तुम्ही मागितलं कसं, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग तुम्ही मागताच कसे? असा सवालच राज ठाकरेंनी केला. पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले होते. भाषणात मोदींनी सांगितलं सत्ता आल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अमित शहांनी सुद्धा तेच सांगितलं. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. त्याच वेळी फोन का केला नाही. त्याचवेळी भेटला का नाही, तुम्ही मला वेगळं सांगितलं आणि आता वेगळ बोलत आहात. निकाल लागल्यावर सगळंच कसं आठवलं. मग काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. मग लोकांनी मतदान कुणाला केलं. असं समजूया शिवसेना आणि भाजपला मतदान करणारे लोकं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणारी लोकं.  लोकांना असं वाटत असेल आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार नको म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हीच त्यांच्यासोबत कसं गेला? हिंमत कशी होते. मतदानांची किंमत कशी केली नाही. जोपर्यंत लोक या सरकारला विचारत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केला. शिवाजी महाराज फक्त आता राजकरणासाठी वापरत आहे. महापुरूष राजकरणासाठी आणि जातीत विभागले आहेत. सगळ्यांची वाईट नजर महाराष्ट्रावर आहे. पेशव्यांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून घेतले नाही ते विचार पुढे घेऊन जात आहे. मी बाळासाहेब आणि प्रबोधनकारांचे विचार पुढे घेऊन जात आहे माझ्याकडे विचार आहे चिन्ह , नाव असलं काय नसलं काय, विचाराने मी श्रीमंत आहे, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या