मुंबई, 11 सप्टेंबर : शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला आहे. दादरमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे दादर येथील बॅनर शिवसैनिकांनी फाडले आहे. तसंच कार्यालयावर देखील दगडफेक कऱण्यात आली आहे. दादरमध्ये मध्यरात्री शिवसैनिक आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यानंतर आज दुपारी दादर पोलीस स्थानकाच्या बाहेर लागलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले असून सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर देखील दगदफेक करण्यात आली आहे. त्यामुळे दादरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला खरा मात्र आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील घातक कलम 395 वगळलं गेलंय तर आमदार सदा सरवणकर,समाधान सरवणकर यांच्याविरोधात अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. मात्र,यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह स्मिता महेश सावंत यांच्यावर जहरी टीका केली आहे. खोटी कामं करायचे धंदे बंद करा असा थेट इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. (पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात चाललंय काय? काँग्रेसचे कार्यकर्तेही गोंधळले) सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह १० जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर ठाकरे गटाच्या ५ ही जणांना जामिनावर सोडले जाणार आहे.