प्रमोद पाटील, प्रतिनिधी मुंबई 26 सप्टेंबर : नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर रविवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला. या अपघातात भरधाव डंपरने दहाहून अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान आता या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची व्हॅन खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशमधील दुर्दैवी घटना नवी मुंबईत असलेला वाशी टोल नाका म्हटलं की वाहनांची संख्या लक्षणीय. याच वाशी टोल नाक्यावर काल संध्याकाळी चार वाजता टोल भरण्यासाठी अनेक गाड्या रांगेत उभा होत्या. इतक्यात मागून आलेल्या एका भरधाव डंपरने जवळपास 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली.
या धडकेत वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामध्ये बस, कार, दुचाकी अशा वाहनांचा समावेश आहे. त्यामध्ये एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यामधील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या डंपरचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आग प्रकरण; नवजात शिशूचा मृत्यू वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. डंपरचा चालक फरार झाला असून क्लिनरला ताब्यात घेतलं आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.चौकशीनंतरच हा अपघात नक्की कसा झाला? याचा खुलासा होईल. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेत व्हिडिओ आता समोर आला आहे.