JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raj Thackeray कधी चैत्यभूमीवर गेले का? कधी 'जय भीम' बोलले का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

Raj Thackeray कधी चैत्यभूमीवर गेले का? कधी 'जय भीम' बोलले का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

राज ठाकरे यांची विकासाची ब्लू प्रिंट कुठे गेली? बेरोजगार मुलांना नोकऱ्या देणार होते. मात्र हीच ती ब्लू प्रिंट आहे का? की बेरोजगार तरुणांना मशिदीसमोर बसून हनुमान चालिसा वाचा आणि भोंगे लावा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

जाहिरात

, राजमुद्रा ही कुणाच्या मालकीची नसते, पण ती कुणालाही वापरता येत नाही. ती राजमुद्रा आणि त्यांच्या झेंड्यावरची राजमुद्रा मोठी करून बघा तुम्हाला लक्षात येईल'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa Melawa 2022) दिवशी सभा घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला. मात्र त्यानंतर राज ठाकरे सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत जय भीम म्हणा असं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटबाबत सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा जोरदार साजरी करा असं म्हणणारे राज ठाकरे त्यांच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर कधी गेले का? कधी जय भीम बोलले का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. राज ठाकरे यांनी नवीन भूमिकेत 14 एप्रिलच्या मिरवणुका जोरदार काढा असं सांगितलं. त्यात काही अडचण नाही त्या दरवर्षी जोरात निघतात. मात्र प्रश्न असा आहे की, आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर तुम्ही किती वेळा गेलात? कधी आपल्या भाषणात जय भीम म्हणालात? मग अचानक काय झालं? लोकांना बरोबर माहिती आहे नक्की काय सुरु आहे. मविआ सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 सुरू, यशवंत जाधव यांना 10 टक्के मिळाले मग 90 टक्के कोणाकडे गेले? : देवेंद्र फडणवीस

राज ठाकरे यांची विकासाची ब्लू प्रिंट कुठे गेली? बेरोजगार मुलांना नोकऱ्या देणार होते. मात्र हीच ती ब्लू प्रिंट आहे का? की बेरोजगार तरुणांनी मशिदीसमोर बसून हनुमान चालिसा वाचा आणि भोंगे लावा. जी धार्मिक तेढ राज्यात कधी नाहीत ती निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहेत माहिती नाही. कारण ते अमावस्या आणि पौर्णिमेला येतात. ते सातत्याने कधी दिसतही नाहीत त्यामुळे अंदाज येत नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या

त्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, “6 डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देणाऱ्या बंधू-भगिनींबद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही. नुसत्या मिरवणुका काय काढायला सांगता संविधानाचा सन्मान राखीन अशी शपथ घ्या. तुमचे भाषणच संविधान विरोधी होते आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीमही म्हणा. निवडणुकीसाठी वाट्टेल ते.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या