JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raigad Crime : 150 जण, 76 कोंबड्या, चाकू-ब्लेड, रायगडच्या फार्महाऊसवर काय सुरू होतं? पोलीसही शॉक

Raigad Crime : 150 जण, 76 कोंबड्या, चाकू-ब्लेड, रायगडच्या फार्महाऊसवर काय सुरू होतं? पोलीसही शॉक

महाराष्ट्रातील रायगड पोलिसांनी मध्यरात्री एका फार्म हाऊसवर छापा टाकत खळबळजनक प्रकार उघडकीस आणला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील रायगड पोलिसांनी मध्यरात्री एका फार्म हाऊसवर छापा टाकत खळबळजनक प्रकार उघडकीस आणला आहे. रायगड येथील फार्म हाऊसवर कोंबड्यांच्या पायाला ब्लेड बांधून झुंज करण्यास भाग पाडले होते. दरम्यान या झुंजीसाठी लाखो रुपयांच्या बोली लावण्यात आल्या होत्या. ही लढत पाहणाऱ्यांसाठी 5 हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले होते, तर कोंबड्याच्या लढतीवर 10 हजार ते 10 लाखांचा सट्टा लावला जात होता. प्राण्यांच्या हत्या करण्याच्या उद्देशाने या धोकादायक खेळात 34 जणांना अटक करण्यात आली असून अनेक जण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि रायगड येथून कोंबड्यांची झुंज खेळणाऱ्यांसाठी बोलावण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबडीच्या पायाला ब्लेड आणि चाकू बांधून कोंबड्याची झुंज केली जाते. एका बाजूची कोंबडी मरेपर्यंत हा लढा सुरूच असतो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसारख्या दक्षिणेकडील राज्यांमधून लढण्यासाठी खास प्रशिक्षित कोंबडीची आयात यासाठी करण्यात येते.

हे ही वाचा :  सख्ख्या भावानेच केली बहिणीच्या घरी लाखोंची चोरी, भाचीच्या लग्नासाठीचे दागिने लांबवले

संबंधित बातम्या

या कोंबड्यांना सुरुवातीपासूनच हिंसक बनवले जाते. त्यांना दीर्घ युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते. ही कोंबडीची झुंज पाहण्यासाठी एक सोशल मीडिया ग्रुप तयार करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे 150 लोक सहभागी झाले होते. या सर्व लोकांकडून ५ हजारांपर्यंतचे प्रवेश शुल्क आधीच वसूल करण्यात आले होते.

कोंबड्याच्या लढाईमागे सट्टा बाजार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक प्रकारचा सट्टा बाजार असून भारतात अशा गोष्टींवर बंदी आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना याची माहिती मिळताच एकूण 4 पथके तयार करून फार्म हाऊसला वेढा घालून छापा टाकला, मात्र फार्म हाऊसमध्ये किती लोक असतील याची पोलिसांनाही माहिती नव्हती.

हे ही वाचा :  हातपंपावर पाणी भरण्यावरून आदिवासी युवकाची हत्या; भिल्ल समाज आक्रमक

जाहिरात

दरम्यान अचानक पोलिसांनाी छापा टाकताच चेंगराचेंगरी झाल्याने फार्म हाऊसच्या लहान असलेल्या भिंतीवरून शेजारी असलेल्या घनदाट जंगलात काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले. अशा परिस्थितीत शेकडो लोक अंधाराचा फायदा घेऊन भिंतीवर चढून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र तरीही 34 जणांना रंगेहात पकडण्यात आले आहे. याचबरोबर फार्म हाऊसमधून पोलिसांना 76 कोंबड्याही पकडण्यात आल्या आहेत.

जाहिरात

चोची धारदार करून लाखोंचा पैज

आरोपींकडे चौकशी केली असता या झुंजीसाठी दहा हजार ते दहा लाख रुपयांपर्यंत बोली लावल्या जातात. धक्कादायक बाब म्हणजे यापेक्षा कितीतरी पटींनी ही लढत पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक उत्साहाने पैसे देऊन येतात. लढण्यापूर्वी, कोंबडीची चोच देखील धारदार केली जाते, जेणेकरून पायात ब्लेडसह चोचीचा देखील पूर्णपणे वापर करता येईल. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या