JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'दादर'गिरी भोवणार, सदा सरवणकरांच्या घरी पोलीस पोहोचले, पिस्तुल होणार जमा?

'दादर'गिरी भोवणार, सदा सरवणकरांच्या घरी पोलीस पोहोचले, पिस्तुल होणार जमा?

सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज पोलीस हे सरवणकरांच्या घरी पोहोचले

जाहिरात

सदा सरवणकर यांच्या बॅगेत बंदूक होती?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दादर, 12 सप्टेंबर : शिवसेनेचा (shivsena) बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये बंडखोर आमदार सदा सरवणकर (mla sada sarvankar) आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज पोलीस हे सरवणकरांच्या घरी पोहोचले आहे. त्यांच्याकडील पिस्तुल ताब्यात घेणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या राड्या प्रकरणात पोलिसांनी आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या मुलाचा विरोधात रविवारी तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीनंतर पिस्तुल चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर कलमं लावण्यात आली आहे. त्यामुळे आज आमदार सदा सरवणकर यांना आज त्यांची पिस्तुल पोलिसंच्या स्वाधीन करावी लागू शकते. सध्या त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काय घडलं दादरमध्ये? प्रभादेवीमध्ये शुक्रवारी शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता. हा वाद शनिवारी आणखी टोकाला गेला. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. (शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी बसवलं शेजारी, म्हणाले हेच शिवसेनेचं ‘ब्रह्मास्त्र’) मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला खरा मात्र आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील घातक कलम 395 वगळलं गेलंय तर आमदार सदा सरवणकर,समाधान सरवणकर यांच्याविरोधात अखेर गुन्ह्याची नोंद झाली. सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पाचही शिवसैनिकांना जामिनावर सोडले जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या