आमच्या देवी दैवतांबद्दल वाटेल ते बोलतो. गणपती, लक्ष्मी यांच्याबद्दल बोलला. म्हणे, हिंदूंच्या देवी-दैवत्ताना मनहूस नाव ठेवतात.
मुंबई, 23 ऑगस्ट : ‘ते XXXखोर ओवेसी, आमच्या देवी दैवतांबद्दल वाटेल ते बोलतो. गणपती, लक्ष्मी यांच्याबद्दल बोलला. म्हणे, हिंदूंच्या देवी-दैवत्ताना मनहूस नाव ठेवतात. आमच्या देवाला नाव ठेवली, त्याला कुणी काही बोललं नाही? त्यांच्या जिभेला बंधणं घालायचा सरकार तयार नाही, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शस्त्रक्रियेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा ठाकरी तोफ धडाडली. यावेळी राज ठाकरेंनी नुपूर शर्मा प्रकरण, हिंदू मुस्लिम मुद्यावर भाष्य केलं. ‘ते XXXखोर ओवेसी, आमच्या देवी दैवतांबद्दल वाटेल ते बोलतो. गणपती, लक्ष्मी यांच्याबद्दल बोलला. म्हणे, हिंदूंच्या देवी-दैवत्ताना मनहूस नाव ठेवतात. आमच्या देवाला नाव ठेवली, त्याला कुणी काही बोललं नाही? देशामध्ये चांगले मुस्लिम झाले. पण या लोकांना कुणी बोलायचा तयार नाही, त्यांच्या जिभेला बंधणं घालायचा सरकार तयार नाही’ अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. (फडणवीसांचं नाव जाहीर केलं तेव्हा का बोलला नाही? राज ठाकरेंचे उद्धव दादूला थेट सवाल) ‘कवी इक्बाल याने सारे जँहा से अच्छा हिंदुस्तान म्हणत आहे, आणि आम्ही हिंदू भारत म्हणत आहोत. नाहीतर सोप आहे इंडिया, एवढ्या गोष्टी एवढ्या घटना आहे, कुणाला गांभीर्य नाही, अशी खंतही राज ठाकरेंनी बोलून दाखवली. नुपूर शर्मांचं केलं समर्थन नुपूर शर्मा काय बोलल्या, त्यांची माफी काय बोलून घेतला. मी त्यांची बाजू घेतली. झाकीर नाईक हा मुस्लिम आहे, त्याने मुलाखतीत सांगितलं होतं, तेच नुपूर शर्मांनी सांगितलं होतं. त्याबद्दल कुणी काही बोललं नाही. त्याचं बोलणं अजून सुरूच आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी नुपूर शर्मांचं समर्थन केलं.