JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nawab Malik Arrest: ईडीने अटकेची कारवाई करताच नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Nawab Malik Arrest: ईडीने अटकेची कारवाई करताच नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सकाळी सात वाजल्यापासून ईडीच्या कार्यालयात नवाब मलिकांची चौकशी सुरू होती. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिकांना अटक (Nawab Malik arrest by ED) केली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यासाठी ईडी कार्यालयातून बाहेर आणले. यावेळी प्रसारमाध्यमांना नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली. (Nawab Malik said we will fight and win, after arrest by ED in money laundering case) काय म्हणाले नवाब मलिक? अटक करण्यात आल्यावर नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येत होते. ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक यांनी हसत-हसत माध्यमांकडे पाहून हात दाखवला. यानंतर नवाब मलिक म्हणाले, घाबरणार नाही तर लढणार - जिंकणार आणि सर्वांना एक्सपोज करणार.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक नवाब मलिकांच्या अटकेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारला एक मोठा झटका बसला आहे. नवाब मलिकांना अटक झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ उपस्थित आहेत. वाचा :  “लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी” अमोल कोल्हेंचं ट्विट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा  मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांना अटक होताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका नवाब मलिक हे सातत्याने भाजप नेत्यांवर आरोप आणि टीका सातत्याने करत होते. भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या नवाब मलिकांना अटक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा एक मोठा झटका बसला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता नवाब मलिकांना अटक झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या