JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nawab Malik : नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Nawab Malik : नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Nawab Malik arrest update: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक मंत्रिपदावरून पायउतार होण्याची शक्यता असून ते राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवर घेऊन जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. आता ईडीने अटक केल्यामुळे नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक मंत्रिपदावरून पायउतार होण्याची शक्यता असून ते राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. जर कोर्टाने त्यांना ईडी कोठडी सुनावली तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यांच्या अटकेबद्दल राज्यपाल यांना सूचना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक तर दुसरीकडे,  नवाब मलिकांच्या अटकेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारला एक मोठा झटका बसला आहे. नवाब मलिकांना अटक झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांना अटक होताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या