JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Navi Mumbai Crime : बुलाती है मगर जानेका नही! तरुणाला महिलेनं कोट्यावधींना लुटलं, मुंबईतील घटना

Navi Mumbai Crime : बुलाती है मगर जानेका नही! तरुणाला महिलेनं कोट्यावधींना लुटलं, मुंबईतील घटना

तुला क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास डबल पैसे परत मिळवून देईन असे सांगत. तब्बल 1 कोटी 60 लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, 27 नोव्हेंबर : नवी मुंबईतील खारघर परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये एक डेटिंग अॅप डाऊनलोड केले होते. त्यात त्याची मैत्री फिलिपाईन्स देशातील एका महिलेशी झाली. काही दिवसांनी त्या महिलेने आपण तुला क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास डबल पैसे परत मिळवून देईन असे सांगत. तब्बल 1 कोटी 60 लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये एक डेटिंग अॅप डाऊनलोड केले होते. त्यात त्याची मैत्री फिलिपाईन्स देशातील एका महिलेशी झाली. काही दिवसांनी त्या महिलेने आपण तुला क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास डबल पैसे परत मिळवून देईन असे सांगत. तब्बल 1 कोटी 60 लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.

हे ही वाचा :  भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त

संबंधित बातम्या

सुरुवातीला तरुणाने काही लाख रुपये दिले दरम्यान परताव्यात त्याला त्याचे डबल पैसे परत मिळाले.  असे अनेक वेळा झाल्याने त्या महिलेने तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने त्याला एक कोटी टाकण्यास सांगितले त्याचे दोन कोटी मिळतील असे सांगण्यात आले.  यावरू त्याने एक कोटींची गुंतवणूक केली,त्याचे डबल मिळाले नाही म्हणून तिने त्याला अजून काही पैसे टाकावे लागतील असे सांगितले. दरम्यान त्या अमिषाला बळी पडून त्याने अजून 60 लाखांची गुंतवणूक केली.

जाहिरात

मात्र डबल पैसे झाले असल्याचे तिने सांगितल्यावर त्याने तात्काळ बँक गाठली, मात्र तुमच्या खात्यात काहीच जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्याला संशय आल्यावर त्याने महिलेला फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद आल्याने त्याचा आणखीनच संशय बळावला. यावर तरुणाने सायबर सेलला फोन करून माहिती घेतली.  

हे ही वाचा :  चोराने मारला ‘चौकार’, नकली पिस्तुल दाखवून लुटले 15 तोळे सोनं!

जाहिरात

दरम्यान त्या तरुणाने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली, यातून त्याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावर तरुणाने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुंन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र परदेशी महिला आणि तिने दिलेले परदेशी अकाऊंट त्यामुळे पोलिसांना सदर महिलेला ताब्यात घेणे मोठे जीकरीचे बनले आहे.

जाहिरात

मात्र एका अॅप वरून झालेली मैत्री करोडो रुपयांची फसवणूक होणारी ठरल्याने त्या तरुणाची चांगलीच निराशा झाली आहे. पोलिसांनी याबाबत असे अॅप डाऊनलोड न करण्याचे आवाहन केले आहे. अशा अनेक तक्रारी आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या