मुंबई, 04 ऑक्टोंबर : मुंबईत एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. कर्ज आणि बहिणीच्या लग्नाला पैसे नसल्याच्या नैराश्यातून पत्नी दोन मुलांसह व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शकील जलील खान (34) या व्यापार्याने स्वतः गळफास पत्नी आणि मुलांना विष देऊन आयुष्य संपविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना मागच्या दोन महिन्यांपूर्वी घडली होती. तब्बल दोन महिन्यांनी शिवाजी नगर पोलिसांनी मृत व्यापारी खान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील गोवंडीतील इंदिरानगर झोपडपट्टीत शकील हा कुटुंबासोबत राहत होता. घर चालवण्यासाठी तो पान, सुपारी विक्रीचा व्यवसाय करत होता. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी 29 जुलै रोजी त्याने पत्नी रजिया (25), मुलगा सरफराज (7), मुलगी अतिसा (3) यांना विष पाजत स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
हे ही वाचा : पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलं; तिघींचाही मृत्यू, डोंबिवलीतील घटनेनं खळबळ
घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ सर्वांना जवळच्या सरकारी रग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. खान याच्यावर दीड लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच बहिणीच्या लग्नाचा खर्च देखील त्यांना करायचा होता. यामुळे ते अतिशय तणावाखाली होते. त्यातुनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
खान याच्यावर दीड लाखाचे कर्ज होते, अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली. तसेच बहिणीच्या लग्नाचा खर्च त्यांना करायचा होता. मात्र पैसे मिळत नसल्यामुळे खान हे नैराश्येत गेले होते. याच तणावातून त्यांनी पत्नी आणि मुलांना शीतपेयातून विष देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच, वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून ही याबाबत पुष्टी मिळाल्याने खानविरोधात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
केचअपच्या बाटलीने चिरला गळा
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. लोहिया यांची त्यांच्या घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली, त्यांच्या शरीरावर जखमाही पाहायला मिळाल्या.
हे ही वाचा : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 वेळा पलटली कार, दोघांचा मृत्यू, LIVE VIDEO
या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. लोहिया यांच्या नोकरानेच खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. नोकर हा जम्मू-काश्मीरमधील रामबनचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांचा मृतदेह त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.